शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

मुक्ताई पालखी सोहळ्याने घेतले पांडुरंगाच्या कळसाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 5:42 PM

दरवर्षी आषाढीला लाखो वैष्णवाच्या उपस्थितीने गर्जणाऱ्या पंढरपुरात यंदा कोरोना सावटामुळे अवघे सुने सुने पंढरीत सकाळी साडेआठ वाजता मुक्ताई पालखी सोहळ्याने नगर प्रदक्षणा घालत श्री विठ्ठलाच्या कळसाचे दर्शन घेतले.

ठळक मुद्देमुक्ताई पादुका गुरुवारी घेणार श्री विठ्ठलाची भेटपालखीचे थाटात नगर प्रदक्षिणा

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : आषाढी सोहळ्यानिमित्ताने शासन नियमाधीन राहून यंदा संत मुक्ताई पालखी सोहळा, बसने मोठ्या भक्तीभावाने मंगळवारी रात्री पंढरीत दाखल झाल्यानंतर बुधवारी सकाळी निस्सीम भक्तीच्या आनंदात संत मुक्ताबाई पादुकांचे सकाळी ८ वाजता चंद्रभागा स्नान झाले. दरवर्षी आषाढीला लाखो वैष्णवाच्या उपस्थितीने गर्जणाऱ्या पंढरपुरात यंदा कोरोना सावटामुळे अवघे सुने सुने पंढरीत सकाळी साडेआठ वाजता मुक्ताई पालखी सोहळ्याने नगर प्रदक्षणा घालत श्री विठ्ठलाच्या कळसाचे दर्शन घेतले. उद्या गुरुवारी मुक्ताई पादुका श्री विठ्ठलाची भेट घेणार आहेत.पायी वारीची परंपरा खंडितकोरोना संकटामुळे दरवर्षी मोठ्या जल्लोषात साजरा होणारा आषाढी सोहळा केवळ मानाच्या पालख्यांना पंढरीत प्रवेश देऊन साजरा करावा, असे निर्देश शासनाने दिले. त्यानुसार पायी वारीची परंपराही यंदा खंडित झाली. कोरोनाच्या भीतीपेक्षा श्रद्धा मोठी ठरवत संत मुक्ताई यासह मानाच्या १० पालख्या मंगळवारी सायंकाळी बसमधून वाखरी तळावर पोहोचल्या.मुक्ताई मठात विसावाप्रत्येक पालख्यातील पादुकांसमवेत २० मानाचे वारकरी होते. बसमधून उतरल्यानंतर मानाच्या पालख्यांसमवेत असलेल्या भाविकांसाठी येथे काही काळ विसाव्यासाठी लहान मंडपाची उभारणी करण्यात आली होती. यावेळी जिल्हा प्रशासन, पंढरपूर पालिका, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांसमवेत आरती करून भक्तीभावाने मुक्ताई पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले. टाळ-मृदंगाचा गजर होऊन पुन्हा बसनेच मुक्ताई पालखी पुन्हा पंढरीत दाखल झाली आणि मुक्ताई मठात विसावा घेतला.चंद्रभागेत पादुकांचे स्नान‘चंद्रभागेचे स्नान आणि दर्शन विठ्ठलाचे घडावे मज जन्मोजन्मी’ या आतुरतेत असलेल्या मुक्ताई पालखी वारकºयांनी प्रशासनाने दिलेल्या निर्धारित वेळेत सकाळी ८ वाजता मुक्ताई मठासमीप दत्त घाटावर पवित्र चंद्रभागेत संत मुक्ताई पादुका स्नान घडले. दरवर्षी हजारो वैष्णवांच्या गर्दीत होणारी चंद्रभागेच्या पाण्यातील पावन करणारी बुडकी यंदा सुनी सुनी होती. मात्र पालखीत सामील २० वारकºयांनी या हजारो वैष्णवांच्या वतीने प्रातिनिधिक पुण्य स्नान केले.मुक्ताई पालखीचे थाटात नगर प्रदक्षिणाचंद्रभागेतील संत मुक्ताई पादुका स्नानानंतर मुक्ताई मठात पादुकांचे विधीवत पूजन पार पडले आणि मोठ्या स्वरूपातील पोलीस फौज फाट्यात मुक्ताई पालखीने थाटात पंढरीत नगर प्रदक्षणा घातली. पंढरी वैकुंठ, रीते वाळवंट, दाटला से कंठ, पांडुरंगा' या आर्त ओढीने आषाढी वारीला कोरोनाच्या संकट काळात ‘कानडा राजा श्री विठ्ठला’च्या कळसाच्या दर्शनाचा आनंद घेतला आणि नगर प्रदक्षिणेनंतर पालखी पुन्हा मुक्ताई मठात विसावली.हभप रवींद्र महाराज यांचे कीर्तनमुक्ताई पालखीची जरी यंदा कोरोना संकटाने पायी वारी झाली नसली तरी मुहूर्तावरच्या प्रातिनिधिक प्रस्थानापासून मुक्ताई पादुकांची सेवा व दैनंदिनी नेहमीप्रमाणे सुरू आहे. याचाच भाग म्हणून मुक्ताई मठात दुपारी हभप रवींद्र महाराज हरणे यांचे कीर्तन झाले आणि हरीपाठ कीर्तनही पार पडले.माऊलीकडून साडी-चोळी भेटदरवर्षी वाखारीत होणारी संत मुक्ताई आणि संत ज्ञानेश्वर माऊलीची भेट यंदा मात्र आषाढीच्या दिवशी सायंकाळी पाचच्या सुमारास माऊलीच्या पादुकांचे प्रत्यक्ष मुक्ताई मठात आगमन होऊन ज्ञानरायाकडून मुक्ताईस साडीचोळी भेट देण्यात आली. या भेटीचा सोहळा इतिहासात प्रथमच मुक्ताई मठात घडला. याप्रसंगी दोन्ही पालखी सोहळ्याचे प्रमुख उपस्थितीत होते.पांडुरंगाची भेट गुरुवारीपांडुरंगाच्या कळसाचे दर्शन बुधवारी घेतल्यानंतर प्रत्यक्ष पांडुरंगाच्या दर्शनासाठी आतुर मुक्ताई पालखी सोहळ्याला सायंकाळपर्यंत श्री विठ्ठल मंदिरात प्रवेशाची प्रतीक्षा होती. परंतु प्रशासनिक आदेश मिळाले नसल्याने उद्या गुरुवारी मुक्ताई पादुकांचे श्री विठ्ठल मंदिरात प्रवेश होईल आणि मुक्ताई श्री विठ्ठलाच्या भेटीचा सोहळा रंगेल.पालख्या पौर्णिमेपर्यंत पंढरीत राहू द्याएक दिवस अगोदर माघारी परतण्याबाबत प्रशासनाकडून सूचना सर्व पालखी प्रमुखांना सूचना देण्यात आल्या. यानंतर सर्व पालखीप्रमुखांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या मठात बैठक घेतली. यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान विकास ढगे पाटील, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानप्रमुख योगेश देसाई, निवृत्तीनाथ महाराज, संजयनाना धोंडगे, मुक्ताई संस्थानचे प्रमुख रवींद्र पाटील, रवींंद्र महाराज हरणे यांच्यासह अन्य महाराज मंडळी उपस्थित होती.आषाढी यात्रेसाठी सर्व नियम अटी पूर्ण करून आलेल्या प्रमुख पालख्या पंढरपुरात आल्या आहेत. दिलेल्या वेळेच्या २ जुलै रोजी माघारी प्रस्थान करण्याचा रेटा प्रशासनाकडून सुरू करण्यात आला आहे. यामुळे सर्व पालखीप्रमुखांनी श्री संतांच्या पालख्या पौर्णिमेपर्यंत पंढरीत राहू द्या. सर्व पालखी सोहळ्यासह आलेल्या भाविकांना श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी वेळ मिळावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्याचे या बैठकीत ठरले. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमMuktainagarमुक्ताईनगर