शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
2
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
3
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
4
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
5
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
6
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
7
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
8
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
9
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
10
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
11
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
12
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
13
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
14
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
15
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
16
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
17
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
18
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
19
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
20
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...

मुक्ताई पालखी पंढरीच्या दारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 10:06 PM

संत मुक्ताबाई आषाढी पालखी मंगळवारी पहाटे चारला संत मुक्ताई नवीन मंदिर येथून लक्झरी बसने पंढरपूरकडे प्रस्थान झाली.

ठळक मुद्देतीन वेळा तपासण्या२० वारकरी सहभागीदिंडीला पाच कर्मचाऱ्यांचे संरक्षण

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : संत मुक्ताबाई आषाढी पालखी मंगळवारी पहाटे चारला संत मुक्ताई नवीन मंदिर येथून लक्झरी बसने पंढरपूरकडे प्रस्थान झाली. सायंकाळी सहाला पालखी पंढरपुरात दाखल झाली. येथून वाखारी येथे पोहचली.तेथूनच ज्ञानेश्वर माऊलीसह मानाच्या नऊ पालखी सोहळ्यांसोबत रात्री पंढरपुरात दाखल झाली असून, संत मुक्ताई मठात विसावली आहे. मुक्ताईच्या हजारो भाविकांचे प्रतिनिधित्व करीत अवघे २० वारकरी या पालखी सोहळ्यात सामील आहेत.‘बस चालती पंढरीची वाट...’कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शतकांची परंपरा असलेल्या श्री संत मुक्ताबाई आषाढी पालखी सोहळा यंदा प्रथमच लक्झरी बसने भू वैकुंठ पंढरीला दाखल झाला आहे.सोमवारी सायंकाळी जुने कोथळी येथील संत मुक्ताई मंदिर येथून पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले होते.रात्री नवे मुक्ताई मंदिर येथे मुक्काम व मंगळवारी पहाटे ४ वाजता खासगी लक्झरी बसने मुक्ताई पालखी पादुका २० वारकऱ्यांना घेऊन पंढरपूरकडे मार्गस्थ झाले आणि रात्रीला मुक्ताई मठात पालखी सोहळा पोहोचला. यंदा पायी वारी नव्हे तर बसने आषाढी पालखी सोहळा पांडुरंग नगरीत दाखल झाला.विधीवत पादुका पूजनाने बसच्या प्रथम मुख्य सीटला सजवून संत मुक्ताईच्या पादुका मोठ्या थाटात भक्तीभावाने आणि संपूर्ण मार्गात टाळमृदुंगाचा गजर भजन कीर्तन, हरिपाठ अखंडपणे सुरू होते. जळगाव पोलीस दलाचे अधिकारी एक वाहनात, तर पाच कर्मचाºयांचे संरक्षण लक्झरी बससोबत होते.२० वारकरी सहभागीसंत मुक्ताबाई संस्थानने स्वखर्चाने लक्झरी बस करून मुक्ताई पादुका पालखी पंढरपूर येथे नेली आहे. संत मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र प्रल्हादराव पाटील,पालखी सोहळाप्रमुख रवींंद्र गजानन हरणे, विश्वस्त नीळकंठ उत्तम मारके, पंजाबराव प्रल्हादराव पाटील, नरेंद्र विश्वनाथ नारखेडे, सम्राट पंजाबराव पाटील, विशाल खोले, राम उद्धव जुणारे, ज्ञानेश्वर विनायक हरणे, धनराज नीळकंठ मारके, लखन उत्तम पाटील, अमोल रवींद्र पाटील, नितीन बाळकृष्ण अहिर, विजय भास्कर खवले, पंकज रंगनाथ पाटील, दीपक सुभाष पाटील, समाधान उत्तम पिंपळे, ज्ञानेश्वर बाबूलाल पाटील, अक्षय चंद्रकांत भोसले, अमोल पीतांबर पाटील या वारकºयांचा दिंडीत समावेश आहे.रात्रीस कीर्तन रंगले : मंगळवारी रात्री मुक्ताई पादुका पालखी मुक्ताई मठात पोहोचल्यानंतर परंपरेप्रमाणे विधीवत पूजन पार पडले व रात्री कीर्तन रंगले.आज पांडुरंगाच्या दरबारातबुधवारी सकाळी शासनाकडून मिळालेल्या निर्धारित वेळेला संत मुक्ताई पादुकांचे चंद्रभागा स्नान होणार आहे. यानंतर श्री विठ्ठल मंदिरात निर्धारित वेळेत प्रवेश करून पांडुरंग दरबारी पादुकांचे श्री विठ्ठलाचे दर्शन घडणार आहे. यावेळी पादुका पालखीचे मंदिर प्रदक्षिणा होणार आहे.या पालखी सोहळ्यात सामील २० वारकºयांची पहिली आरोग्य तपासणी मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली. त्यानंतर पंढरपूर सीमेवर पुन्हा आरोग्य तपासणी करण्यात आली, तर उद्या बुधवारी आषाढी एकादशीला मंदिरात प्रवेशाच्या आधी पुन्हा आरोग्य तपासणी होणार आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमMuktainagarमुक्ताईनगर