ऑनलाईन लोकमत
मुक्ताईनगर,दि.18- श्री संत मुक्ताई समाधी स्थळावरून 30 मे रोजी निघालेली मुक्ताई पालखी हजारो वारक:यांसह विठ्ठल भेटीच्या ओढीने मजलदरमजल करीत रविवारी सकाळी पाथरवाला मुक्कामानंतर जालना जिल्ह्याचा निरोप घेत शहागड येथे गोदावरीतीरावर वाळकेश्वर मंदिरात आली. भाविकांसोबत मुक्ताई पादूकांना गोदावरी स्नान घालण्यात आल़े
शहागड येथे दुपारी विसावा घेत ज्वारी-बाजरीच्या भाकरीसोबत आमटीचे वारकरीनी भोजन घेतल़े आजचा प्रवासाचा 20 वा दिवस होता़ सलग तीन दिवसापासून कडक ऊन असलेतरी तरीही वारक:यांना कुठेही थकवा जाणवला नाही़
बीड जिल्ह्यात प्रवेश करतेवेळी वारक:यांमध्ये उत्साहाचे वातावरण होत़े सिमेलगतच्या खामगाव ग्रामस्थांनी सोहळ्याचे पालखीचे जोरदार स्वागत केले
भिमातीरी एक वसविले नगर !
त्याचे नाव पंढरपूर रे !!
तेथिल मोकाशी चार भुजा त्याशी !!
बाईला सोहळा हजारो रे!!
नाचत जावू त्याच्या गावा रे खेळीया !
सुख देईल विसावा रे !!
आनंदाने भजनात तल्लीन होत बीड जिल्ह्यातील गेवराईचा 27 किमी आजचा प्रवास सहज पार करण्यात आला़
गेवराई पालखीचे मान्यवर तहसीलदार, नगराध्यक्ष व शहर वासियानी फटाक्यांचा आतषबाजीसह स्वागत केले. श्री केशवराज मंदिरात पालखी मुक्कामी आली़ ग्रामस्थांनी घरोघरी वारकरी नेवून आई मुक्ताई आपल्या घरी आली अशी भावना ठेवत यथोचित स्वागत करीत भोजन दिले. सोमवारी सकाळी सहा वाजता पालखी पुढील नामलगाव मुक्कामाकडे प्रस्थान करणार आह़े