शहरं
Join us  
Trending Stories
1
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
2
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
3
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
4
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
5
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
6
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
7
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
8
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
9
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
10
'इस्रायलने इराणवर हल्ले करावे, पण...', जो बायडेन यांचा बेंजामन नेतन्याहूंना सल्ला
11
धोनी, विराट की रोहित... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने दिलं उत्तर
12
तिरुपती मंदिराबाबत नवा वाद, प्रसादात सापडले किडे; मंदीर प्रशासनाने दिले स्पष्टीकरण
13
"छत्रपतींच्या स्मारकालाच अडचणी का येतात?", रोहित पवार काय म्हणाले?
14
Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न
15
INDW vs PAKW : रेणुकाचा कमालीचा इन-स्विंग चेंडू; पाक बॅटर फक्त बघतच राहिली अन्..
16
संजय राऊतांना पवित्र करण्यासाठी अयोध्याला पाठवू; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका
17
पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
18
"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला
19
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI
20
तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री जबाबदार; मनोज जरांगेंनी काय दिला इशारा?

मुक्ताईनगर येथील मुक्ताई साखर कारखान्याने दिला २० रुपये वाढीव भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 7:09 PM

मुक्ताईनगर , जि.जळगाव : मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई शुगर अ‍ॅण्ड एनर्जी लि., या साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात उसाचा ...

ठळक मुद्देऊस पुरवठादारांना मिळणार आता एकूण १८०० रुपये प्रति मेट्रिक टन भावकारखान्याने प्रतिदिन तीन हजार ३०० मेट्रिक टन ऊस गाळपाचा गाठला उच्चांक१८०० रुपये प्रति मेट्रिक टन एकरकमी दर ऊसपुरवठादार शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करणे सुरू

मुक्ताईनगर, जि.जळगाव : मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई शुगर अ‍ॅण्ड एनर्जी लि., या साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात उसाचा एफ.आर.पी.प्रमाणे प्रति मेट्रिक टन १७८० आणि २० रुपये वाढ असे एकूण १८०० रुपये प्रति मेट्रिक टन एक रकमी दर ऊसपुरवठादार शेतकºयांच्या खात्यात वर्ग करण्यात येत आहे, तर कारखान्याने प्रतिदिन तीन हजार ३०० मेट्रिक टन असे उच्चांकी गाळप गाठले आहे.२९ आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या कारखान्याच्या पाचव्या गळीत हंगामात आतापर्यंत ७७१३० मे.टन ऊस गाळप झाले आहे. ६१३०० क्विंटल साखर उत्पादन झालेले आहे व आज ९.४५ टक्के साखर उतारा मिळत असून, सरासरी साखर उतारा ८.३८ आहे. त्याचप्रमाणे कारखान्याचा १२ मेगाव्हॅट सहवीजनिर्मीती प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित आहे. या प्रकल्पातून २५ लाख ३६ हजार ८०० युनिट वीज कंपनीला निर्यात करण्यात आलेली आहे.गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी कारखाना व्यवस्थापनामार्फत चालू हंगामात देय असलेला उसाचा एफ.आर.पी. दर रुपये १७८० प्रति मे.टन आहे, त्यामध्ये प्रति मे. टन २० रुपये वाढ करुन १८०० रुपये प्रति मे.टन एक रकमी दर देण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे कारखान्याने १५ नोव्हेंबरपर्यंत आलेल्या उसाचे १८०० रुपये प्रति मे.टनाप्रमाणे ऊस बील संबंधित शेतकºयांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आलेले आहे व यापुढील ऊस बील एफ.आर.पी. धोरणानुसार वेळोवेळी कारखाना मुदतीत अदा करेल, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव यांनी दिली.कारखान्यामध्ये आवश्यक ती मशिनरी दुरुस्ती व आधुनिकीकरण करून घेतले. यामुळे चालू हंगामात कारखाना ३२०० ते ३३०० मे.टन प्रति दिन गाळप करीत आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पसुद्धा पूर्ण क्षमतेने सुरू आहे. याप्रमाणे गाळप होत राहिल्यास कारखाना ऊर्जितावस्थेत येऊन ऊस उत्पादकांना जास्तीत-जास्त ऊस दर देणे सोईचे होणार आहे. कारखान्याची अशीच वाटचाल सुरू राहण्यासाठी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांनी ऊस लागवड करून जवळील वाहतुकीचा ऊस उपलब्ध झाल्यास शेतकºयांना अधिक ऊस दराचा मोबदला देणे सोईचे होईल, असे कारखान्याच्या उपाध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी कळविले आहे.२५०९ मेट्रिक टन क्षमतेच्या या करखान्यात अत्याधुनिकीकरण करून ५ रोजी कारखान्याने उच्चांकी ३३५० मे.टन ऊस गाळप केले असून, ३००० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. त्याबद्दल कारखाना व्यवस्थापनाकडून अधिकारी व कर्मचाºयांचे अभिनंदन करण्यात आले, अशी माहिती जनरल मॅनेजर अमृत देवरे यांनी दिली.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेMuktainagarमुक्ताईनगर