विनायक वाडेकरमुक्ताईनगर, जि.जळगाव : जून महिन्यात धडक कारवाई करीत कुºहा, रिगाव व कोºहाळा या तीन गावांमधून जप्त केलेली एकूण ५९८ ब्रास वाळू वाºयावर सोडत बेजबाबदारपणाचा कळस महसूल प्रशासनाने दाखवला असून, त्यातील मोठ्या प्रमाणावर वाळू ही वाळूमाफिया व अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची बाब उघडकीस आली आहे.१४ जून २०१८ रोजी तत्कालीन तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल यांच्यासह पोलीस पाटील यांच्या पथकाने धडक मोहीम राबवत मुक्ताईनगर तालुक्यात विविध ठिकाणी वाळू साठे जप्त केले होते. त्याचे पंचनामेदेखील केले होते. यात एकट्या कुºहा गावात २९८ ब्रास वाळू जप्त केली होती, तर रिगाव येथे १५० व कोºहाळा गावी १५० ब्रास वाळू महसूल प्रशासनाने जप्त केली होती. त्यानंतर मात्र महसूल प्रशासनाने या जप्त केलेल्या वाळू साठ्यांना वाºयावर सोडलेले दिसून येत आहे.गेल्या पाच महिन्यांपासूनही वाळू जप्तीच्या पंचनाम्यानंतर संबंधितांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश दिलेले आहेत. असे असताना मात्र कोणतीही कारवाई न करता नियोजनशून्य कारभारदेखील महसूल प्रशासनाचा दिसून आला. वाळू जप्त केल्यानंतर संबंधित गावचे पोलीस पाटलांकडे जप्त केलेली वाळू ही देखरेखीसाठी वर्ग करण्यात आली. मात्र पोलीस पाटील यांच्याकडे असलेली कामे बघता विविध ठिकाणी गंज करून ठेवलेली वाळू पोलीस पाटील कशी सांभाळू शकेल? या प्रश्नाचे उत्तर मात्र अनुत्तरीत आहे. केवळ कुºहा गावाचा विचार केला असता १९ ठिकाणांवरून २९८ ब्रास वाळू ही जप्त करण्यात आली होती. गावात व गावाच्या परिसरात असलेले १९ गंज एक पोलीस पाटील सांभाळणार कसे व त्याचे संरक्षण करणार कसे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.विशेष म्हणजे कुºह्याचे पोलीस पाटील विजय पाटील यांच्यावर वाळूमाफियांनी मध्यंतरीच्या काळात दगडफेकदेखील केलेली होती. कोणतेही पोलीस संरक्षण अथवा महसूल प्रशासनाचे पथक संरक्षणासाठी उभे नसताना एकट्या पोलीस पाटलांवर ही जबाबदारी टाकणे म्हणजेच उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार निदर्शनास येत असल्याची टीका होत आहे.रिगाव येथे १५० ब्रास वाळू ही जप्त करण्यात आली असून, जप्त केलेले वाळूचे साठे विविध ठिकाणी आहेत. त्यामुळे पोलीस पाटलांना हे गंज सांभाळणे कठीण जात आहे. रिगावचे पोलीस पाटील युवराज बगडे यांनी यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार केलेली आहे. कोºहाळा या गावी १५० ब्रास वाळू जप्त तत्कालीन महसूल पथकाने केली होती. मात्र पोलीस पाटील राम पाटील यांच्याकडे अतिरिक्त कारभार असल्याने व पोलीस पाटलाकडे गणपती उत्सव, विविध उत्सव काळात कायदा-सुव्यवस्था व पोलीस प्रशासनाची कामे पोलीस पाटील विविध ठिकाणी असलेले सांभाळणार कसे? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यातच कोºहाळा शिवारात वाघाचे वास्तव्य असल्याने वाघाच्या वास्तव्याच्या ठिकाणी रात्री-अपरात्री या वाळूचे संरक्षण कसे करावे, हा मोठा प्रश्न पडलेला आहे.महसूल पणाच्या बेजबाबदारपणामुळे ५९८ म्हणजे जवळपास सहाशे ब्रास वाळूपैकी बहुतांशी वाळू ही वाळू माफियांकडून रात्री-अपरात्री पळवण्यात येत आहे. यासंदर्भात पोलीस पाटील यांनी आठ ते दहा वेळेस जिल्हाधिकाºयांकडे तक्रारी अर्ज पाठवून संबंधित वाळूचा विल्हेवाट लावण्याचा आग्रह धरला आहे. मात्र आठ ते दहा वेळेस पत्रव्यवहार करूनदेखील त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. मध्यंतरी उपजिल्हाधिकाºयांचे पथक येऊन जप्त केलेल्या वाळूचा लिलाव करणे कामी पाहणी व पंचनामा केला. मात्र पाहणी केल्यानंतर तीन हजार ७० रुपये प्रति ब्रासप्रमाणे भाव लिलावासाठी जाहीर केल्याने कोणीही वाळू घेण्यास पुढे धजावले नाही. बाजारभावापेक्षा उपजिल्हाधिकाºयांनी दिलेला हा भाव अधिक असल्याने ही वाळू पडून आहे. पण त्यातील बरीचशी वाळू ही काही बांधकामासाठी वापरून घेतलेली आहे, तर काही वाळूमाफियांनी पळवून नेलेली आहे. विशेष म्हणजे काही वाळूमालकांनी आपल्याकडे असलेली रॉयल्टीदेखील महसूल प्रशासनाला सादर केलेली आहे. मात्र गेल्या पाच महिन्यात ती रॉयल्टी खरी का खोटी, याची शहानिशा अजूनदेखील महसूल प्रशासन करू शकले नाही.प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा कळस म्हणजे पाच महिन्यांपासून वाळू ही बेवारस स्थितीत केवळ तीन पोलीस पाटलांवर जबाबदारी टाकून स्वत:ची जबाबदारी झटकण्याचा हा एक प्रकार आहे. वाळू पंचनामा झाल्यानंतर ५९८ पैकी मी भरल्यास त्याची जबाबदारी कोणाची, हा खरा प्रश्न आहे. महसूल प्रशासन पोलीस पाटलांवर ही जबाबदारी टाकून स्वत: झटकण्याचा प्रकार करू शकते. मात्र पोलीस पाटील विविध ठिकाणी असलेल्या रात्री-अपरात्री व तेही पाच पाच महिने वाळू कसे सांभाळेल, हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे. गंभीर बाब म्हणजे वाळू चोरीस जात असल्याची बाब संबंधित पोलीस पाटलांकडून तहसीलदार व महसूल प्रशासनाकडे निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिसांकडे गुन्हे दाखल करा, असे तोंडी आदेश पोलीस पाटलांना दिले जातात. मात्र पोलिसांकडे गेल्यावर त्यांच्या तक्रारीला पोलीस विभागदेखील महत्त्व देत नसल्याचे गेल्या पाच महिन्यात सिद्ध झाले आहे.वाळूसंदर्भात कारवाई सुरू आहे. लवकरच पुन्हा एक पथक पाठवून वाळूची किंमत ठरवण्यात येईल व त्यानुसार वाळूचा लिलाव करण्यात येईल. चोरीस गेली असेल तर तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडून अहवाल मागवला जाईल.-नीलेश पाटील, नायब तहसीलदार, मुक्ताईनगरगेल्या पाच महिन्यांपासून वाळूची निगराणी केली जात आहे. माझ्याकडे असलेली विविध कामे, गावातील कायदा व सुव्यवस्था यासोबतच विविध उत्सव, सण यामुळे आणि रात्री अपरात्री वाळूची देखरेख करणे हे गैरसोयीचे आहे. त्यातच सोबत कोणतेही संरक्षण नसल्याने वाळू रात्री-अपरात्री चोरीस जाऊ शकते.-विजय पाटील, पोलीस पाटील, कुºहा, ता.मुक्ताईनगर
मुक्ताईनगर तालुक्यात ५९८ ब्रास वाळू सोडली वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 9:22 PM
महिन्यात धडक कारवाई करीत कुºहा, रिगाव व कोºहाळा या तीन गावांमधून जप्त केलेली एकूण ५९८ ब्रास वाळू वाºयावर सोडत बेजबाबदारपणाचा कळस महसूल प्रशासनाने दाखवला असून, त्यातील मोठ्या प्रमाणावर वाळू ही वाळूमाफिया व अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची बाब उघडकीस आली आहे.
ठळक मुद्देमहसूल प्रशासनाचा बेजबाबदारपणाचा कळसपोलीस पाटलांना गोवण्याचा केला जातोय प्रयत्नपोलीस पाटील म्हणतात, कामाच्या ओझ्यामुळे वाळू सांभाळणे होतेय जिकिरीचे