कुºहा काकोडा, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : शेतात लावलेल्या उन्हाळी कपाशीची सुमारे ३०० झाडे अज्ञात इसमाने उपटून फेकली. तसेच ठिबकच्या नळ्यासुद्धा कापून फेकल्या. चारठाणा शिवारातील शेतात हा प्रकार घडला. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.बोदवड येथील शेतकरी वाल्मीक गंगाधर हटकर यांची मौजे चारठाणा शिवारात शेत जमीन असून त्याचा गट क्रमांक १०० आहे. या शेतात त्यांनी यंदा मे महिन्यातच कपाशी पेरली. सिंचनासाठी ठिबकची व्यवस्था केली आहे. त्यामुळे कपाशी व तुरीचे पीक जोमात होते, तर कपाशी फुलपातीवर आली आहे. मात्र बुधवारी रात्री अज्ञात इसमाने त्यांच्या शेतातील कपाशीचे ३०० झाडे उपटून फेकले. तसेच ठिबक नळ्यासुद्धा कापून टाकल्या. गुरुवारी सकाळी हा शेतकरी कोळपणीसाठी शेतात गेला असता हा प्रकार त्याच्या लक्षात आला. उपटलेली झाडे पाहून हा प्रकार जंगली डुकरांनी केला असावा, अशी त्यांना शंका आली मात्र ठिबकच्या नळ्यासुद्धा कापून टाकल्या होत्या. त्यामुळे हा प्रकार हा खुनशी वृत्तीने करण्यात आल्याची खात्री पटल्यानंतर वाल्मीक हटकर यांनी कुºहा येथील पोलीस चौकीत तक्रार दिली आहे. दोषी इसमाचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अज्ञात इसमाने शेतातील उभे पीक उपटून फेकल्यामुळे या शेतकºयाचे आर्थिक नुकसान झाले आहे. घडलेल्या प्रकाराने शिवारातील इतर शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
मुक्ताईनगर तालुक्यात अज्ञात इसमाने कपाशीची ३०० झाडे उपटून फेकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 6:10 PM
शेतात लावलेल्या उन्हाळी कपाशीची सुमारे ३०० झाडे अज्ञात इसमाने उपटून फेकली.
ठळक मुद्देचारठाणा शिवारातील घटनेने शेतकरी हवालदिलमाथेफिरूवर कारवाई करण्याची मागणीइतर शेतकऱ्यांमध्ये भीती