मुक्ताईनगर, जि.जळगाव : येथील बसस्थानकावर विद्यार्थ्यांना पासेस मिळविण्यासाठी हाल होत असल्याच्या निषेधार्थ शिवसेना व मराठा ग्रामीण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. अखेर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतल्यानंतर तूर्त आॅफलाईन पासेस गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. परिणामी विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.येथील बसस्थानकावर शालेय पासेस बनविण्यासाठी केवळ एकच कॉम्पुटर असल्याने शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनी उपाशीपोटी तासन्तास ताटकळत थांबून होते. याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी पासेस खिडकीवर जाऊन विद्यार्थ्याच्या अडचणीबाबत संबंधित कर्मचाऱ्याशी चर्चा केली. तेव्हा कर्मचाऱ्यांनी एकच कॉम्प्युटर असल्याने व आॅनलाईन सिस्टीम स्लो असल्याचे सांगितले. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करीत पासेसबाबत होणारी व्यथा मांडली. रावते यांनी विभागीय नियंत्रक जळगाव (महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ) यांना तत्काळ तात्पुरत्या स्वरूपात आॅफलाईन पासेस देण्याच्या व पासेस खिडकीवर आणखी किमान दोन कॉम्प्युटर उपलब्ध करण्याच्या सूचना केल्या. यामुळे प्राथमिक स्वरूपात जिल्हाप्रमुख पाटील यांनीच लागलीच काही विद्याथ्यार्ना तात्पुरत्या आॅफलाईन पासेस वाटप केल्या व उर्वरित विद्यार्थ्यांचा तत्काळ देण्याच्या सूचना केल्या.याप्रसंगी तालुकाप्रमुख छोटू भोई, जिल्हा नियोजन समिती सदस्य अॅड.मनोहर खैरनार, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे, चांगदेव ग्रामपंचायत सदस्य पंकज कोळी, नगरसेवक संतोष मराठे, बेलसवाडी शाखाप्रमुख मजीद खान, शुभम शर्मा यांच्यासह अनेक शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.दरम्यान, मुक्ताईनगर ग्रामीण मराठा टीमनेदेखील बसव्यवस्थापनाच्या भोंगळ कारभारा विरोधात गुरुवारी मुक्ताईनगर ग्रामीण मराठाची टीम रस्त्यावर उतरून मुक्ताईनगर बसस्थानकांमधून जाणाºया सर्व बसेस रोखून धरल्या. जोपर्यंत पासेस आॅफलाईन पद्धतीने तसेच लवकरात लवकर मिळत नाही तोपर्यंत एकही बस बसस्थानकाच्या बाहेर जाऊ देणार नाही, असा पवित्रा टीमच्या कार्यकर्त्यांनी घेतला. त्यानंतर बस डेपो मॅनेजर साठे यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य करून पासेस आॅफ लाईन पद्धतीने वितरण करण्यास सुरवात केली.याप्रसंगी निवेदन देताना टीम मुक्ताईनगर ग्रामीण मराठाचे अॅड. पवनराजे पाटील, हर्षल पाटील, योगेश पाटील, पवन कºहाड, आकाश कोळी, सागर भोई, एन.आर.पाटील, सचिन पाटील, छबिलदास पाटील, संतोष पाटील, युवराज कोळी, भैया पाटील, शुभम पाटील, भोळा पाटील आदी उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक तसेच कॉन्स्टेबल मुकेश घुगे आदींनी बंदोबस्त ठेवला.
मुक्ताईनगरात आंदोलनामुळे आॅफलाइन पासेस मिळण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 5:42 PM
मुक्ताईनगर बसस्थानकावर विद्यार्थ्यांना पासेस मिळविण्यासाठी हाल होत असल्याच्या निषेधार्थ शिवसेना व मराठा ग्रामीण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले.
ठळक मुद्देपासेससाठी ठिय्या आंदोलनशिवसेना व मराठा ग्रामीण संघटनेचा पुढाकारप्रश्न मार्गी लागेपर्यंत बसेस धरल्या रोखून