आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२ : १४ मार्चपासून बंद पडलेली जळगाव-मुंबई विमानसेवा ‘एअर डेक्कन’कडून २२ एप्रिलपासून म्हणजेच ३९ दिवसांच्या ‘ब्रेक’नंतर पुन्हा आठवड्यातील तीन दिवस सुरू करण्यात येत आहे. कंपनीच्या वेबसाईटवर तिकीट बुकिंग सुरू झाली आहे. नवीन टाईम स्लॉटनुसार विमानसेवेच्या वेळेत जळगावकरांच्या दृष्टीने सोयीचे बदल झाले असून आता सकाळी ११.०५ वाजता जळगावहून निघालेले विमान दुपारी १२.४५ वाजेपर्यंतच मुंबईत पोहोचणार आहे. पुणे विमान सेवेबाबत मात्र शांतताच आहे.३१ डिसेंबरपासून आठवडाभरातून केवळ ३ दिवसच ही विमानसेवा सुरू होती. ती सेवा देखील १४ मार्चपासून विविध कारणांनी बंद पडली होती. त्यामुळे प्रवाशांची निराशा व गैरसोय झाली. ही विमानसेवा लवकरच सुरू करण्याचे सांगितले जात होते.मात्र मुंबई विमानतळाचे टाईम स्लॉट मिळालेले नसल्याने अडचण निर्माण झाली होती. त्यामुळेच २४ मार्चनंतरचे विमानसेवेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आलेले नव्हते. अखेर मुंबई विमानतळावरचे टाईम स्लॉट ‘एअर डेक्कन’ला मिळाले. तर वैमानिक नसल्याची अडचण निर्माण झाली. अखेर २२ एप्रिलपासून गुरुवार, शुक्रवार व रविवार असे तीन दिवस सेवा सुरू करण्यात येणार कंपनीच्या वेबसाईटवर तिकिटांचे बुकिंग सुरू झाले आहे.पुणे सेवेची तारीख नाहीविमान कंपनीने जळगाव-पुणे विमानसेवेचीही तयारी केली आहे. दोन्ही विमानतळांचे टाईम स्लॉटही घेतले आहेत. आठवड्यातून ३ दिवस ही सेवा दिली जाणार आहे. मात्र ही सेवा सुरू करण्याची तारीख अद्यापही जाहीर झालेली नाही.नवीन वेळ सोयीची... गुरूवार, शुक्रवार व रविवार असे तीन दिवस जळगाव-मुंबई ही सेवा देण्यात येणार असून नवीन टाईम स्लॉटमुळे विमानाच्या वेळेतही बदल झाले आहेत. आता मुंबईहून सकाळी ७.४० वाजता विमान निघून जळगाव विमानतळावर सकाळी ९.१५ वाजता पोहोचेल. तर जळगाव विमानतळावरून सकाळी ११.०५ वाजता निघून मुंबईत १२.४५ वाजता पोहोचेल. त्यामुळे तातडीचे काम असल्यास विमानाने मुंबईत जाऊन ते काम आटोपून रात्री रेल्वेने जळगावला परतणे शक्य होणार आहे.
मुंबई विमानसेवा ३९ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर २२ पासून सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 3:53 PM
जळगावात ३ दिवस सेवा : आता दुपारी १२.४५ वाजताच पोहचणार मुंबईत
ठळक मुद्देजळगाव-मुंबई मिळणार तीन ३ दिवस सेवादुपारी १२.४५ वाजताच पोहचणार मुंबईतपुणे विमान सेवेबाबत मात्र शांतता