भूषण श्रीखंडे, जळगाव: हावडा वरून येणारी मुंबई हावडा मेल क्रमांक १२८०९ यात टायमर बॉम्ब ठेवलेला असून नाशिक स्थानक येण्यापूर्वी त्याचा स्फोट होणार आहे, अशी धमकी ट्विटर वरून धमकी रेल्वे पोलिसांना मिळली. जळगाव रेल्वे स्थानकावर सोमवारी पहाटे ४. १५ मिनिटाला गाडी येतात रेल्वे पोलीस, जळगाव पोलीस दल व बॉम्ब शोधक पथक तसेच रेल्वे कर्मचारी यांच्याकडून गाडीची संपूर्ण तपासणी करण्यात आली. तपासणी कोणत्याही प्रकारची संशयित वस्तू आढळून आल्यामुळे गाडी पुढे रवाना करण्यात आली.
सोमवार दि. १४ सकाळी पहाटे तीन वाजून पाच मिनिटाला मध्य रेल्वे विभागाच्या रेल्वे पोलीस दलाला ट्विटर द्वारे मुंबई हावडा मेल मध्ये टायमर बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे. यात मोठा स्पोट नाशिक स्थानक येण्यापूर्वी होणार अशी धमकी मिळाली होती. तात्काळ भुसावळ रेल्वे पोलीस दल व जळगाव रेल्वे पोलीस दल तसेच स्टेशन प्रबंधक कौस्तुभ चौधरी यांना तत्काळ माहिती देण्यात आली. जळगाव पोलीस दलाचे बॉम्बशोधक पथकाला देखील माहिती दिल्यावर तत्काळ रेल्वे स्थानकावर हे पथक तपासणीसाठी हजर झाले. गाडी ४.१५ वाजता जळगाव स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर हावडा मेल येताच रेल्वे पोलीस व बॉम्बशोधक पथकाने तब्बल दोन तास ११ मिनिट गाडीची संपूर्ण तपासणी करण्यात आली.
भुसावळ रेल्वे पोलीस दलाचे अशोक कुमार, बॉम्बशोधक पथकाचे पोलीस निरीक्षक अमोल कवाडे यांच्यासह पथक, जळगाव व भुसावळ रेल्वे पोलीस दलाचे अधिकारी व कर्मचारी, जीआरपी कर्मचारी, ट्रेनचे ट्रेन एस्कॉर्टिंग कर्मचारी, कमर्शियल ट्रेन चेकिंग कर्मचारी, स्टेशन प्रबंधक यांनी संपूर्ण रेल्वे ची तपासणी केली. संपूर्ण रेल्वे मध्ये कोणताही टायमर बॉम्ब तसेच स्पोटक पदार्थ सापडले नाहीत. त्यानंतर मुंबई हावडा मेल जळगाव स्थानकावरून सकाळी ६ वाजून २८ मिनिटाला मुंबईकडे रवाना करण्यात आली.