जळगाव : शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन हे विद्यार्थ्याच्या वजनापेक्षा निम्मे असल्याने विद्यार्थ्यांना दप्तरामुळे पाठ दुखीचा त्रास वाढत आहे. तसेच दप्तराचे वजन कमी करण्यात यावे अशी मागणी अनेक शिक्षण तज्ज्ञ व पालकांकडून होत होती. मात्र, शासनाकडून याबाबत कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. आता जळगाव महापालिका प्रशासनाकडून मनपा शाळांसह, खासगी शाळांमधील विद्यार्थ्याच्या दप्तराची तपासणी करून, दप्तराचे वजन कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त अजित मुठे यांनी दिली.अजित मुठे यांनी बुधवारी आपल्या उपायुक्तपदाचा पदभार स्विकारला. मुठे यांनी अस्थापना, बालवाडी, क्रीडा, वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून आपल्या अखत्यारित येत असलेल्या सर्व विभागांचा आढावा घेतला. मनपा शाळांची स्थिती सुधाण्यावर भर दिला जाणार असून पोषण आहाराचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. विद्यार्थ्यांचा दप्तराबाबत केवळ मनपाच नाही. तर खासगी शाळांमध्ये देखील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असून, लवकरच प्रशासन अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली जाणार असल्याचे त ेम्हणाले.गरजू खेळाडूंना मनपा देणार प्रशिक्षणमनपा शाळांसह अनेक खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये खेळाची गुणवत्ता असते. मात्र, त्यांना वेळीच प्रशिक्षण मिळत नसल्याने विद्यार्थ्यांमधील खेळाडू आकार घेवू शकत नाही. अशा गरजू खेळाडूंना मनपाकडून चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याबबत त्यांनी मनपा क्रिडा विभागाचे विवेक अळवणी यांच्यासोबत प्राथमिक चर्चा केली. तसेच यासाठी शहरातील काही खासगी क्रिडा संस्थासोबत देखील चर्चा करण्यात येणार आहे.दंडवते यांनी घेतला स्वच्छ अभियानाचा आढावासर्वजनिक आरोग्याचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांनी वाहन विभाग, दवाखाने, स्वच्छ भारत अभियानातंर्गत कामांचा आढावा घेतला. एकमुस्त सफाईचा ठेका सुरु करण्याबाबत संबधित मक्तेदारांसोबत चर्चा केली. दरम्यान, वॉटरग्रेस कंपनीकडून गुरुवारी शहराची प्राथमिक स्तरावर तपासणी करून आढावा घेणार असल्याची माहिती दंडवते यांनी दिली.शहरातील स्वच्छतेवर भर दिला जाणार असून, यासाठी नागरिकांचा देखील समावेश करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच महसूलचे उपायुक्त उत्कर्ष गुट्टे यांनी देखील मनपाच्या मूदत संपलेल्या मार्केटमधील गाळ्यांबाबतची माहिती घेतली. तसेच किरकोळ वसुली विभागाकडून उत्पन्नाच्या स्त्रोतांबाबत माहिती घेतली.आयुक्तांनी दिला उपायुक्तांना ‘केआरए’मनपा आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी मनपात नव्याने रुजू झालेल्या तीन्ही उपायुक्तांना महिन्याचा केआरए दिला असून, महिन्यात मनपाच्या दृष्टीने महत्वाची ठरेल असा एक उपक्रम किंवा उदिष्ठ करण्याची जबाबदारी दिली आहे. तसेच याबाबत शहरातील सामाजिक संस्थाचे पदाधिकारी, वकील, शिक्षण तज्ज्ञांना समाविष्ठ करून नाविन्य उपक्रम राबविण्यावर आता मनपाचा भर राहणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन कमी करण्यासाठी मनपा सरसावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 12:12 PM