जळगाव : महापालिकेतील एका महिला पदाधिकाऱ्यास कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा तपासणी अहवाल शनिवारी पॉझिटीव्ह आला असून त्या खासगी रुग्णालयात दाखल आहे़ दरम्यान, शहरात नवीन ९८ रुग्ण आढळून आले असून पिंप्राळा परिसरात सर्वाधिक ११ रुग्णांची नोंद आहे़ गेल्या काही दिवसांपासून या भागात सातत्याने बाधितांची संख्या वाढत आहे़ शनिवारी या परिसरातील एका बाधिताचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. महापालिकेच्या महिला पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक बाधित आढळून आले होते़ दोन दिवसांपूर्वी त्यांनाही अंगदुखीचा त्रास व्हायला लागल्याने त्यांनी तातडीने वेळ न दडवता कोरोना तपासणी करून घेतली़ त्यात त्या बाधित आढळून आल्या़ दुसरीकडे शहरातील रुग्णसंख्या ३४६६ झाली असून यापैकी ८५३ रुग्ण उपचार घेत आहेत़ दरम्यान, ६९ रुग्णांना शनिवारी बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आहे़ या भागात आढळले रुग्ण पिंप्राळा ११, गुजराल पेट्रोलपंप ५, विठ्ठलपेठ ३, वाघनगर, महाबळ, गायत्रीनगर, हरिविठ्ठल नगर, आहुजा कॉलनी, खोटेनगर, प्रज्ञा कॉलनी, बी़ जे़ मार्केट अक्सानगर या भागात प्रत्येकी २ यासह शिवाजीनगर, देवराम नगरनिवृत्तीनगर, दादावाडी, पोलीस लाईन, रथचौक, प्रेमनगर, चंदूअण्णा नगर या भागात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे़ मृत्यू सहाशे पार कोरोनामुळे जिल्ह्यात ६०१ बाधितांचा मृत्यू झाला आहे़ त्यामुळे मृतांची संख्या आता ६०० वर गेली आहे. शनिवारी ९ बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ यात भुसावळ २, चोपडा २, अमळनेर, चाळीसगाव, जळगाव तालुका, पाचोरा, एरंडोल येथे प्रत्येकी एका बाधिताचा मृत्यू झाला आहे़ मृतांमध्ये दोन रुग्ण रूग्ण हे ५० वर्षाखालील आहेत.
महापालिकेच्या पदाधिकारीही कोरोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 1:13 PM