यावल, जि.जळगाव : अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी शहरात होत असलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पालिकेने नागरिकांना आवश्यक सेवा घरपोहोच देण्यासंदर्भात नियोजन करावे, अशा सूचना प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी, पालिकेस दिल्या आहेत.अत्यावश्यक सेवेअंतर्गत सुरू असलेल्या दुकानावर साहीत्य शहरात होत असलेली गर्दी पाहता प्रांताधिकारी डॉ.थोरबोले यांनी येथील तहसील कार्यालयात पालिकेस सूचना केल्या आहेत. त्यात म्हटले आहे की, मुख्याधिकारी व संबधित प्रभागांचे नगरसेवक यांनी नियोजन करून नागरिकांना किराणा, औषधी, दूध, भाजीपाला या वस्तूंसह घरपोच द्याव्यात. शहरातील फैजपूर रस्त्यावर थांबत असलेल्या फळ-फळावळांच्या लोटगाड्या रस्त्यावर न थांबू न देता, नागरिकांच्या घरपोहोच सेवा देण्याबाबत तत्काळ नियोजन करावे. तसेच बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांसाठी येथील साने गुरूजी विद्यालयात विलगीकरण कक्ष तयार करयाच्या सूचना दिल्या आहेत. याप्रसंगी तहसीलदार जितेंद्र कुवर, निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार उपस्थित होते.
पालिकेने नागरिकांना घरपोच सेवा द्याव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2020 2:41 PM
अत्यावश्यक सेवेअंतर्गत सुरू असलेल्या दुकानावर साहीत्य शहरात होत असलेली गर्दी पाहता प्रांताधिकारी डॉ.थोरबोले यांनी पालिकेस सूचना केल्या आहेत.
ठळक मुद्देप्रांताधिकारी डॉ. थोरबोले यांच्या सूचना यावल तहसील कार्यालयात झाली बैठक