जळगाव : चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रतिभा प्रदीप पाटील (वय ४७) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने या गुन्ह्यातील अटकेतील संशयित मनोज शिवाजी चंदेले (वय २२) या तरुणाविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवारी वाढीव कलम लावण्यात आल्याची माहिती तपासाधिकारी रोहीदास ठोंबरे यांनी दिली.पिंप्राळा परिसरातील शंकरअप्पानगरात राहणाऱ्या मनोज शिवाजी चंदेले (वय २२) या तरूणाने शेजारीच राहणा-या प्रतिभा प्रदिप पाटील या महिलेवर चार वेळेस चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची थरारक घटना शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली होती़ या महिलेवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन काही पुरावे गोळा केले. पिंप्राळा परिसरातील शंकरअप्पा नगरात प्रदिप पाटील हे पत्नी प्रतिभा यांच्यासह वास्तव्यास आहेत़ शहरात त्यांचे खते, बी-बियाण्याचे भागीदारीत दुकान आहे़ त्यांना एक मुलगा असून तो पुणे येथे शिक्षण घेत आहे़ यातील संशयित आरोपी मनोज हा शेजारीच राहणारा असून वाणिज्य शाखेत शिक्षण घेत आहे.खेडगाव नंदीचे येथे झाले अंत्यसंस्कारप्राणघातक हल्लयातील महिला ही खेडगाव नंदीचे,ता.पाचोरा येथील आहे. सोमवारी रात्री या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पाचो-याचे आमदार किशोर पाटील हे खासगी रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात तळ ठोकून दुपारी शवविच्छेदन व पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह खेडगाव नंदीचे येथे नेण्यात आला. तेथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.
चाकू हल्ला प्रकरणात तरुणाविरुद्ध खुनाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:19 PM
चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रतिभा प्रदीप पाटील (वय ४७) यांचा उपचारादरम्यान मृत्यू
ठळक मुद्देशनिवारी घडली होती़ थरारक घटना खेडगाव नंदीचे येथे झाले अंत्यसंस्कार