शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

भुसावळ शहरात रंगला मुशायरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:58 AM

अनीक फाऊंडेशन आणि खान्देश उर्दू रायटर्स यांच्यातर्फे ‘रगो मे खून न होता तो मर गये होते’ आणि ‘वक्त क्यूं शाम का आंखो मे ठहर जाता है’ या अंत्य यमकावर आधारीत गझल सादरीकरणाचा कार्यक्रम खडका चौफुलीवर पार पडला.

ठळक मुद्देजग कितीही झपाट्याने बदलत असले तरी साहित्य निर्मिती प्रक्रियेत पारंपरिक मापदंडांना महत्वाचे स्थान आहे त्यांना सोडून दर्जेदार साहित्य निर्मिती होऊ शकत नाहीखान्देशच्या शायरांनी उर्दू साहित्यात दिलेल्या ऐतिहासिक योगदानाबद्दल झाला उहापोह

भुसावळ, जि.जळगाव : अनीक फाऊंडेशन आणि खान्देश उर्दू रायटर्स यांच्यातर्फे ‘रगो मे खून न होता तो मर गये होते’ आणि ‘वक्त क्यूं शाम का आंखो मे ठहर जाता है’ या अंत्य यमकावर आधारीत गझल सादरीकरणाचा कार्यक्रम खडका चौफुलीवर पार पडला.हाफिज मुश्ताक साहिल यांच्या कुराण पठणाने आणि रईस फैजपुरी यांच्या प्रेषित स्तवनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. सुप्रसिद्ध लघुकथाकावर अहमद कलीम फैजपुरी अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी खान्देश उर्दू रायटर्स फाऊंडेशनचे संस्थापक, लघुकथा लेखक आणि माजी प्राचार्य सगीर अहमद यांनी प्रास्ताविक केले. आकाशवाणीचे जावेद अन्सारी यांनी भावी कृती योजनांबद्दल माहिती दिली. कविवर्य रईस फैजपुरी, शकील हसरत, शाहीर नुसरत, साईद जिलानी, हाफिज मीनानगरी, रहीम राजा, काझी रफीक राही, शकील अंजूम मीनानगरी, अखलाक निजामी, वकार सिद्दीकी, हाफिज मुश्ताक साहिल, इकबाल असर, रफीक पटवे आणि इशराक रावेरी यांनी संयोजकांनी दिलेल्या अंत्ययमकावर आधारीत आपापल्या गझला सादर केल्या.डॉ.गयास उसमानी यांनी उर्दू भाषेच्या लोकप्रियतेबद्दल विचार प्रकट केले तर कय्यूम असर आणि शकील मेवाती यांनी सादरीकृत गझलांचे परीक्षण केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात अहमद कलीम फैजपुरी यांनी उर्दू साहित्य चळवळ नव्याने जोम धरत आहे याबद्दल समाधान व्यक्त केले. खान्देशच्या शायरांनी उर्दू साहित्यात दिलेल्या ऐतिहासिक योगदानाबद्दल माहिती दिली व ईमान ब्यावली, कमर भुसावली, सैफ भुसावली आणि मिर्जा मुस्तफा आबादी यांच्या निवडक शेरोशायरीवर प्रकाश टाकला. जग कितीही झपाट्याने बदलत असले तरी साहित्य निर्मिती प्रक्रियेत पारंपरिक मापदंडांना महत्वाचे स्थान आहे त्यांना सोडून दर्जेदार साहित्य निर्मिती होऊ शकत नाही असे मत व्यक्त केले.या कार्यक्रमाला अब्दुल रशीद कासमी, मुश्ताक करीमी यासह हनीफ खान ईस्माईल उर्फ मल्लू शेठ, हाजी अंसार और नदीम मिर्जा इत्यादी मान्यवर आणि जिल्ह्यातील अनेक उर्दू साहित्य प्रेमी उपस्थित होते. सूत्रसंचालन हारुन उस्मानी व आभार अनीक फाऊंडेशनचे अध्यक्ष शकील हसरत यांनी केले. 

टॅग्स :literatureसाहित्यBhusawalभुसावळ