शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

कोरोनाचे संकट दूर व्हावे यासाठी मुस्लीम समाज बांधवांनी केली ईदच्या दिवशी दुवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 7:53 PM

कोरोना संकट दूर व्हावे, देशाची आर्थिक व्यवस्था बळकट व्हावी तसेच जनजीवन पूर्ववत व्हावे यासाठी ईद-उल-फित्रला घराघरात दुवा करण्यात आली.

ठळक मुद्देगळाभेट व हस्तांदोलन न करता प्रथमच झाली 'ईद' साजरीहालत हमे इजाजत नही देती हम खुशिया मनायेबच्चा कंपनीचा हिरमोड, यंदा नाही मिळाली ‘ईद्दी’ कोरोना संकट दूर व्हावे यासाठी ईद-उल-फित्रला घराघरात दुवा

भुसावळ : शहर व परिसरामध्ये यंदा अत्यंत साध्या पद्धतीने घरातच ईद साजरी करण्यात आली. कोरोना संकट दूर व्हावे, देशाची आर्थिक व्यवस्था बळकट व्हावी तसेच जनजीवन पूर्ववत व्हावे यासाठी ईद-उल-फित्रला घराघरात दुवा करण्यात आली. तसेच यंदा ईदमध्ये गळाभेट, हस्तांदोलन टाळून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासमोर मोठे संकट आले आहे. या स्थितीत देशाची आर्थिक स्थिती डबघाईला जात आहे. सर्वसामान्यांची उपजीविका चालवणे अवघड बनले आहे. याकरिता मुस्लिम समाज बांधवांनी नवीन कपडे त्यागून गोरगरिबांची जास्तीत जास्त मदत करण्याकडे भर दिला. यंदा ईदची सामूहिक नमाज पठण न झाल्यामुळे साहजिकच गळाभेट वस्तू हस्तांदोलनही समाज बांधवांनी टाळले.हालत हमे इजाजत नही देती हम खुशिया मनायेदेशावर मोठे कोरोनाचे संकट आले असताना हातावर पोट भरणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असताना तसेच महामारीच्या या काळात अनेक बांधव महामारीचा सामना करत असताना 'हालत हमे इजाजत नही देते की, हम ईदकी खुशियाँ मनायें’, असे भावनिक वाक्य अनेक ठिकाणी ऐकण्यास मिळाले.'ईद' हा आनंद साजरा करण्याचा पर्व असतो. मात्र यंदा ईद अत्यंत साध्या पद्धतीने घरातच राहून साजरी करण्यात आली. जुन्या जाणत्यांंच्या मते आयुष्यात कधीही ईदची नमाज घरी पठण केली नाही. मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे. सन २०२० च्या ईदची इतिहासात नक्कीच नोंद होईल, येणाºया ईदमध्ये आजच्या ईदच्या आठवणींना उजाळा मिळेल.हिंदू बांधवांनी सोशल मीडियावर दिले मुस्लीम बांधवांना शुभेच्छा.घडविले जातीय सलोख्याचे दर्शनईद नमाज पठण झाल्यानंतर हिंदू समाज बांधव मुस्लीम समाज बांधवांच्या घरी येऊन ईदच्या शुभेच्छा देतात व मुस्लीम बांधवही त्यांना शिरखुर्माचा आस्वाद घेतल्याशिवाय जाऊ देत नाही. नेहमीच ईदला जातीय सलोखा दिसून येतो. यंदा परिस्थिती वेगळी असल्यामुळे हिंदू समाज बांधवांनी सोशल मीडिया, भ्रमणध्वनीद्वारे मुस्लीम समाज बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.बच्चा कंपनीचा हिरमोड, यंदा नाही मिळाली ‘ईद्दी’यंदा ईदला बच्चे कंपनीचा चांगला हिरमोड झाला. ईदला भेटण्यासाठी येणारे प्रत्येक आप्तेष्ट बच्चे कंपनीला ईद्दी (भेट) देतात. यंदा मात्र घरच्या घरीच ईद साजरी झाल्यामुळे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले. फक्त फोनवर शुभेच्छा देण्यात आल्या. यामुळे बच्चे कंपनींना ईद्दी मिळाली नसल्याने बच्चे कंपनीचा चांगला हिरमोड झाला.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमBhusawalभुसावळ