जळगाव : सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून वातावरण तापले आहे. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र ते देताना मुस्लीमांचाही विचार करावा. मी या ठिकाणी मतांचे विभाजन करण्यासाठी नाही तर मने जुळविण्यासाठी आणि माझ्या मुस्लीम बांधवांच्या मनातील भिती दूर करण्यासाठी आल्याचे ‘एमआयएम’चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शनिवारी झालेल्या प्रचार सभेत सांगितले.एमआयडीसीसीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील बाजूस गणपतीनगरात झालेल्या या सभेत व्यासपीठावर ‘एमआयएम’चे आमदार वारिस पठाण व पक्षाचे सर्व नगरसेवक यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाभरातील समाजबांधव सभेला उपस्थित होते.काँग्रेस व राष्ट्रवादी हे आमच्यावर मतविभाजनाचा आरोप करतात. मात्र मी मतविभाजनासाठी नाही, तर मने जुळविण्यासाठी आलो आहे. येथील तरुणांच्या मनात जी भीती आहे ती दूर करण्यासाठी आलो आहे.गळाभेटीने नव्हे तर न्याय केल्याने द्वेष मिटतोपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गळाभेटीने मुस्लीम बांधवांचे प्रश्न मिटणार आहेत का ? त्यामुळे मुस्लीमांना आरक्षण, गौ-रक्षकांकडून मुस्लीमांच्या हत्या थांबणार आहेत का? तर नाही. भाजपा असो किंवा काँग्रेस या सर्वांकडून मुस्लीमांना धोक्याशिवाय दुसरे काहीच मिळालेले नाही. त्यामुळे एमआएम हा सक्षम पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चार वर्षात जगभरातील अनेक देशांच्या दौऱ्यावर गेले. या काळात तब्बल १४०० कोटी रुपयांचा खर्च झाला. मी जर मोदी यांची गळाभेट घेतली असती. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी मोदी किंवा कुणाची गळाभेट घेणार नाही.शासकीय नोकरीमध्ये फक्त ४ टक्के मुस्लीममराठा बांधवांप्रमाणे मुस्लीम बांधव देखील आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे. सद्यस्थितीला सरकारी नोकरीत मुस्लीमांचे प्रमाण हे केवळ ४ टक्के आहे. तर आयएएस व आयपीएस या वरिष्ठ पदावर २ टक्के आहेत.
मराठा आरक्षण देताना मुस्लीमांचाही विचार व्हावा - खासदार असदुद्दीन ओवैसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 1:04 PM
भीती दूर करण्यासाठी आलो
ठळक मुद्देगळाभेटीने नव्हे तर न्याय केल्याने द्वेष मिटतोशासकीय नोकरीमध्ये फक्त ४ टक्के मुस्लीम