पाचोरा : बांधीव प्लॉटचा व्यवहार ठरवून सौदापावती एकाशी व खरेदीखत दुसºयाशी करून फसवणूक केल्या प्रकरणी पाचोºयातील व्यापाºयावर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत प्राप्त माहिती अशी की, पाचोरा येथील अब्बास अब्दुल्लाभाई बोहरी याने त्याच्या मालकीचा गट न ६३५ मधील प्लॉट नं. ५ क्षेत्र ११७० चौफूट पैकी बांधीव प्लॉट गोपालदास सुरजमल अग्रवाल रा. इंदिरा नगर पाचोरा यांना ६ लाखात २४ आॅगस्ट २०१७ रोजी स्टॅम्प पेपरवर सौदापावती लिहून बयांना रक्कम ५ लाख रोख घेऊन ठरवलेला होता. २६ सप्टेंबर २०१८ ला उर्वरित रक्कम देऊन खरेदीखत नोंदविणे होते.मात्र अब्बास बोहरी याने सदर प्लॉट २० फेब्रुवारी २०१९ रोजीच एकुलती ता. जामनेर येथील पंकज रमेश मुनिया यांना खरेदीखत नोंदवून दिला. फियार्दी अग्रवाल हे ठरल्याप्रमाणे २६/९/२०१८ रोजी जामनेर येथे दुययंम निबंधक कार्यालयात गेले असता तेथील संबंधित स्टॅम्प वेंडरकडे चौकशी केली असता सदरील प्लॉट -घर पूर्वीच खरेदी झाल्याचे कळाले. यामुळे व्यथित होऊन गोपालदास अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पाचोरा पोलिसात भादवि ४२० प्रमाणे अब्बास अब्दूलभाई बोहरी याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा शुक्रवारी रात्री दाखल झाला आहे.
प्लॉटची परस्पर विक्री, पाचोऱ्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 5:48 PM