शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेतून आढळले साडेचार हजार रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 1:01 PM

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेतून साडेचार हजार रुग्ण आढळले.

ठळक मुद्देदीड लाख नागरिकांची केली तपासणी५६१ पैकी ५३ रुग्ण निघाले कोरोना बाधित

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी राबविण्यात येणारी ह्यमाझे कुटुंब माझी जवाबदारीह्ण या मोहीमेअंतर्गत तालुक्यातील ग्रामीण भागात १ लाख ५२ हजार १०९ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात ४ हजार २५२ रूग्णांना विविध आजार असल्याचे समोर आले. सहा रुग्ण सारी या आजाराचे, तर ५६१ संशयितांपैकी ५३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. विशेष म्हणजे २९ रुग्ण कुष्ठरोगाचे निघाले आहेत.माझे कुटुंब माझी जवाबदारीह्णयोजनेत गावातील ग्रामसेवक, सरपंच, जिल्हा परिषद सदस्यांपासून नगरसेवक व आमदारांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींनी सहभागी होणे अपेक्षित आहे. घराघरात जाऊन कोणी आजारी आहे कोणी आजारी आहे काय, मधुमेह, उच्च रक्तदाबाचे वा अन्य आजाराचे रुग्ण शोधणे, वृद्ध लोकांची माहिती गोळा करणे तसेच ताप व खोकला असल्यास करोना चाचणी व उपचार करून घेणे आदी कामे या मोहिमेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.१४५ पथकेतालुक्यातील ग्रामीण भागात ८१ गावांमध्ये १४५ पथकांच्या माध्यमातून ही मोहीम राबविली जात आहे. एका पथकात आशावर्कर, अंगणवाडी सेविका एक शिक्षक व एक आरोग्य कर्मचारी यांचा समावेश आहे.सारीचे सहा रुग्णतालुक्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत ३५ हजार ५८३ कुटुंबातील १ लाख ५२ हजार १०९ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ५६१ कोरोना संशयित, ३६३ सर्दी ताप खोकला, २५८ हिवताप, ऑक्सिजन प्रमाण कमी असलेले तर सारी या आजाराचे ६ रुग्ण मिळून आले आहेत.ररक्तदाब, मधुमेह रुग्ण संख्या बाळावतेयइतर आजाराचे चार हजार २५२ इतके रुग्ण या मोहिमेत मिळून आले आहे. यात दोन हजार २१४ उच्च रक्तदाब, ७८ हृदय रक्तदाब,१३४० मधुमेह, १११ अस्थमा, ३० किडनी विकार, ६१ रुग कँसर,५२ क्षय रोग, तर २९ रुग्ण कृष्ठ रोगाचे मिळून आले आहे. उच्च रक्तदाब आणि मधुमेह रुग्णांची संख्या बळावते आहे.२९ कृष्ठरोगीसन २००५ मध्ये कृष्ठरोगाचे प्रमाण देशात दर दहा हजारांत एकपेक्षा कमी इतके नोंदविले गेले. त्यामुळे हा प्रश्न आता फार मोठा राहिला नाही, म्हणून सर्व कुष्ठरोग योजना शासनाने बंद केली व कुष्ठरोगाची औषधे सर्वसाधारण रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिली. परंतु अजूनही नवीन रुग्ण समाजात आढळून येत आहेत. तालुक्यात २९ रुग्ण मिळून येणे लक्षवेधी आहे.

टॅग्स :Healthआरोग्यMuktainagarमुक्ताईनगर