शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

ईशान्येकडील लोकांबाबत चुकीचा समज: मीरा कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 12:25 PM

डॉ.आचार्य ‘अविनाशी सेवा’ पुरस्कार विजेत्यांनी साधला संवाद

ठळक मुद्दे २० वर्षे आसाममध्ये सेवाकार्य प्राचार्यांचा विद्यार्थ्यासाठी १५६ किमी पायी प्रवास महिला-पुरूष भेदभाव नाही

जळगाव : ईशान्य भारतातील नागरिक भारतापासून स्वत:ला वेगळे समजतात, त्यांची भूमिका भारतविरोधी असल्याचा समज चुकीचा असून काही खास प्रशिक्षीत केलेल्या ठराविक गटांकडूनच हा अपप्रचार केला जात आहे. याउलट या भागातील नागरिक मनमिळावू असून नवीन माणसांना लगेचच सामावून घेतात, असे प्रतिपादन डॉ.आचार्य ‘अविनाशी सेवा’ पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्त्या मीरा कुलकर्णी यांनी केले.पुरस्कारवितरण सोहळ्यापूर्वी रविवार, ४ मार्च रोजी सकाळी पुरस्कारप्राप्त मीरा कुलकर्णी व दीनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप वडनेरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर दीनदयाल मंडळाचे समन्वयक गजानन पळसोदकर, तसेच केशव स्मृती सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर हे देखील उपस्थित होते.मूळच्या जळगावच्या व गेली २० वर्षे आसाममध्ये सेवाकार्य करणाºया मीरा रघुनाथ कुलकर्णी यांना वैयक्तिक गटात तर यवतमाळच्या दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळाला संस्था गटात हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्या सोहळ्यानिमित्त जळगावात आलेल्या कुलकर्णी व वडनेरकर यांनी पत्रकारांशी मनमोकळेपणाने संवाद साधत त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती व अनुभव कथन केले.२० वर्षे आसाममध्ये सेवाकार्यमीरा कुलकर्णी म्हणाल्या की, भारत परिक्रमेची काही व्याख्याने १९९३ मध्ये मु.जे. महाविद्यालयात शिकत असताना ऐकली. तेव्हाच विवेकानंद केंद्राचे पूर्णकालीन काम करण्याचा निर्धार त्यांनी केला. १९९७ पासून त्यांनी या कामाला सुरूवात केली. १९९८ मध्ये आसामला गोलाघाट येथे कामाला प्रारंभ केला.सुरूवातीला तेथे विवेकानंद केंद्राच्या शाळेत अकाऊंटचे व नंतर शिकविण्याचेही काम पार पाडले. त्यानंतर जोरघाट येथे संघटक तर दिब्रुगढ येथे प्रांत संघटक म्हणून काम केले. आजपर्यंत प्रांतसंघटक म्हणून कार्यरत आहेत. या सामाजिक कार्यादरम्यान नागरिकांशी सहज संवाद साधता यावा, यासाठी त्यांनी आसामी भाषाही आत्मसात केली.कुलकर्णी यांनी एकदा दिब्रुगडहून खेमाजीला ब्रम्हपुत्रानदीतून ३ तासांचा प्रवास करून जातानाचा आलेला अनुभव सांगितला. या ठिकाणचे लोक अत्यंत साधे, सरळ व अनोळखी लोकांनाही लगेचच आपलेसे करून घेणारे असल्याचे कुलकर्णी यांनी आवर्जून सांगितले. या ठिकाणी आता शिक्षणााचा प्रसार चांगल्यापैकी होत असून सुविधा उपलब्ध होत असल्याचे सांगितले.प्राचार्यांचा विद्यार्थ्यासाठी १५६ किमी पायी प्रवासआसाम, अरूणाचलप्रदेशमधील बहुतांश भाग हा दुर्गम डोंगर-दºयांनी वेढलेला असल्याने भूस्खलन नेहमीच होत असते. अशावेळी रस्ते बंद होऊन वाहनांची ये-जा थांबते. अरूणाचल प्रदेशात एकदा असाच प्रसंग उद्भवलेला असताना विवेकानंद केंद्राच्या शाळेतील एका विद्यार्थ्याची विज्ञान स्पर्धेसाठी निवड झालेली होती. त्यामुळे प्राचार्य त्या विद्यार्थ्याला घेऊन १५६ किमी पायी चालत गेले. शिक्षणासाठी एवढी पायपीट केल्याचे अलिकडच्या काळातील हे एकमेव उदाहरण असावे, असेही त्यांनी सांगितले.महिला-पुरूष भेदभाव नाहीतुम्हाला आसामसारख्या परक्या राज्यात सामाजिक कार्याला सुरूवात करताना स्त्री म्हणून काही अडचणी आल्या का? असे विचारले असता मीरा कुलकर्णी म्हणाल्या की, ईशान्येकडील राज्यांमध्ये महिला व पुरूष असा भेद फारच कमी प्रमाणात बघावयास मिळतो. तेथे स्त्रीयांना मानाचे स्थान आहे.पारधी समाज परिवर्तनाच्या वाटेवरलोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : यवतमाळ जिल्ह्यातील पारधी समाजाच्या विकासासाठी प्रकल्पराबविण्याच्या उद्देशानेच स्थापन झालेल्यादीनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप वडनेरकर म्हणाले की, बेड्यांवर (वस्त्या) राहणारा पारधी समाज मुख्य प्रवाहापासून आजही दूर आहे. या समाजात शिक्षण, आरोग्य याचा लवलेशही नाही. आंघोळ माहिती नाही. पाऊस पडून ओला झाला तरच आंघोळ, अंगात घातलेला कपडा फाटेपर्यंत अंगातून काढायचाच नाही, असाच जणू समज. अशा या मागासलेल्या समाजात अनिष्ट रूढीही मोठ्या प्रमाणावर. असा हा अशिक्षीत, मागास समाज केवळ पोटभरण्यासाठी गुन्हेगारी कृत्य करीत असे. यवतमाळ येथे एका मैदानावर वर्षानुवर्षांपासून उघड्यावरच वास्तव्य करणाºया या समाजाच्या कुटुंबांकडे पाहून या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काहीतरी करावे, असे ठरवून दीनदयाल मंडळाची स्थापना केली. या समाजात शिक्षीत, सुसंस्कारीत लोक निर्माण केले, की ते समाजाला पुढे नेतील, या उद्देशाने सुरूवातीला जेमतेम ५ मुले आणून छात्रावासाची सुरूवात केली. ती मुलेही पळून जात. मात्र नंतर या उपक्रमात हळूहळू यश येत गेले. आज २० वर्षात मोठे परिवर्तन सुरू झालेले दिसत आहे. मुले चांगली शिक्षीत, संस्कारी व्हायला लागली. आता तेच आपले गाव, घर चांगल करतील, या उद्देशाने ३०० विद्यार्थ्यांना शिकविले. त्यातील १६५ विद्यार्थी तर दीनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळाचेच कार्यकर्ते म्हणून काम करीत आहेत. पारधी समाजात आरोग्याबाबत जनजागृती व्हावी, यासाठी ३५ बेड्यांवर आरोग्य रक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच हा पारधी समाज हिंदू समाजाचाच भाग असल्याची जाणीव व्हावी, यासाठी बेड्यांवर जाऊन दिवाळी साजरी करण्याचा उपक्रमही साजरा केला जात असल्याचे सांगितले.आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतयवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबाला, त्यांच्या मुलांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे कामही मंडळ करीत आहे. ४०० कुटुंबांना दत्तक घेतले आहे. तर दरवर्षी ५० मुलांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीही दिली जात असल्याचे प्रदीप वडनेरकर यांनी सांगितले. शेती संशोधनासाठी केंद्र सुरू केले असून दोन आयआयटीयन्सदेखील आले असल्याचे त्यांनी सांगितले.