लोकमत ऑनलाईन अमळनेर, दि.18 : साखर कारखान्याच्या गळीत शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्रांनी नाभिक समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याच्या विरोधात विविध संघटनांनी शनिवारी दुकाने बंद ठेवून निषेध केला आणि प्रांताधिका:यांना निवेदन दिले. पुणे जिल्हयातील दौंड तालुक्यातील पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला मारताना म्हटले होते की, न्हावीकडे तीन चार ग्राहक बसले असतील तर ते पळून जायला नको म्हणून एकाला लावतो, त्याची अर्धी कापतो, दुस:याची अर्धी कापतो तिस:याची शेंडी कापतो असे वक्तव्य केल्याने समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून या वक्तव्याचा निषेध करून अमळनेर तालुक्यातील नाभिक समाज पंच मंडळ, विरभाई कोतवाल नाभिक युवा संघटना , शिवर} जिवा महाले संघटना, नाभिक दुकानदार संघटना यांनी निषेध करून शहरातील 300 दुकाने शनिवारी बंद ठेवली. तसेच प्रांत कचेरीवर मूकमोर्चा काढून प्रांताधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर मधुकर सैंदाणे, अशोक ठाकरे , विलास येशी, भटू सैंदाणे, अशोक सूर्यवंशी, कैलास बिरारी, नंदलाल जगताप, अप्पा पगारे, धनराज ठाकरे , निलेश निकम, आर. एस. खोंडे आदी पदाधिका:यांसह 100 समाज बांधवांच्या सह्या आहेत. यावेळी तहसीलदार यांनाही निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या प्रति गृहमंत्री व मुख्यमंत्री यांनादेखील पाठवण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ अमळनेरात नाभिकांचा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 6:36 PM
नाभिक समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शनिवारी अमळनेरात नाभिक समाज बांधवांनी कडकडीत बंद पाळून प्रांत कार्यालयावर मूकमोर्चा काढला.
ठळक मुद्देप्रांताधिकारी आणि तहसीलदारांना दिले निवेदनशहरातील तब्बल 300 दुकाने बंद