आॅनलाईन लोकमत,
जळगाव-दि.९,धरणगाव तालुक्यातील पथराड येथे मंगळवारी रात्री यात्रेनिमित्त आयोजित तमाशात सापाचा खेळ दाखविणाºया तमाशा मंडळाच्या मालकाला वन्यप्रेमी व वनविभागाच्या अधिकाºयांनी धाड टाकून पकडले. याबाबत पाळधी पोलीस स्टेशनमध्ये तमाशा मंडळाचे मालक अभिमन नामदेव बोरसे यांच्या विरोधात वन्यप्रेमींनी तक्रार केली. बुधवारी सकाळी पाळधी पोलीसांनी तमाशा मालकाला समज देवून सोडण्यात आले. तसेच भविष्यात तमाश्यातून सापांबाबत जनजागृती करण्याचे आश्वासन देखील पोलीसांनी तमाशा मालकाकडून घेतले.
पथराड येथे मंगळवारी यात्रा भरली होती. या निमित्त रात्री जिल्ह्यातील प्रसिध्द नामा-भिमा तमाशा मंडळाच्या तमाश्याचे आयोजन गावात करण्यात आले. रात्री ११ वाजेपासून तमाशाला सुरुवात झाल्यानंतर लोकांना आकर्षित करण्यासाठी मंडळाचे मालक अभिमन बोरसे यांच्याकडून विषारी समजल्या जाणाºया नाग या जातीच्या सापाचा खेळ दाखविण्यास सरुवात केली. सापांचा खेळ करण्यास कायद्याने बंदी घातल्यामुळे गावातील काही सर्पमित्रांनी याबाबत वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण देवरे व वासुदेव वाढे यांना माहिती दिली.
रात्री १२ वाजता टाकली धाडमाहिती मिळाल्यानंतर अवघ्या तासाभरात पाळधी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील, वनपाल सुनील पाटील, वासुदेव वाढे, बाळकृष्ण देवरे व योगेश गालफाडे यांनी पथराड येथे जावून तमाशा सुरु असतानाच साप हस्तगत केला. अभिमन बोरसे यांच्याकडे नाग जातीचा साप आढळून आला. तसेच या सापाचे दात काढण्यात आले होते. तमाशाचा कार्यक्रम बंद न पाडता केवळ साप हस्तगत करून आरोपीला सकाळी पाळधी पोलीस स्थानकात हजेरी लावण्याची सूचना दिली.
भविष्यात तमाशातून करणार सापांबाबत जागृतीसकाळी ९ वाजता बोरसे यांनी पाळधी पोलीस स्थानकात हजेरी लावल्यानंतर त्यांना सापांचा खेळ न करण्याचा सूचना देण्यात आल्या. तसेच भविष्यात तमाशातून सापांबाबत जगजागृती करण्याचे आश्वासन बोरसे यांच्याकडून करून घेण्यात आले. तमाशातून जप्त करण्यात आलेल्या सापावर शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करण्यात आले असल्याची माहिती वासुदेव वाढे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.