जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ’ अशा नामविस्तार सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. प्रवेशद्वारावर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव टाकण्यास गुरुवारी सायंकाळी सुरुवात झाली आहे.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नामविस्तार सोहळ्याच्या निमित्ताने विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासह इमारतींना रंगरंगोटीचे काम सुरु झाले आहे. गुरुवारी मुख्य प्रवेशद्वारावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नाव टाकण्यास सुरुवात झाली. जळगावातील यशवंत गरूड व त्यांचे सहकारी हे प्रवेशद्वारावर नाव लिहिण्याचे काम करीत आहेत. शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हे नाव पूर्ण करण्याची सूचना विद्यापीठ प्रशासनाकडून गरूड यांना देण्यात आली आहे.प्रवेशद्वारालगत असलेल्या कोनशिलेचे बांधकाम देखील पूर्ण झाले आहे. या ठिकाणी केवळ कोनशिला लावण्याचे काम बाकी आहे. दरम्यान, मंत्रालयाकडून या कार्यक्रमाबाबतची अधिसूचना प्राप्त झालेली नसली तरी नामविस्तार सोहळ्याची तयारी विद्यापीठामार्फत अंतिम टप्प्यात आहे.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर झळकले बहिणाबार्इंचे नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:20 PM
विद्यापीठ नामविस्तार सोहळा
ठळक मुद्देकोनशीलेसह सोहळ्याची अन्य तयारी अंतिम टप्प्यातकोनशिलेचे बांधकाम पूर्ण