वाचक हो, आपण सज्ञान झाल्यापासून व्यवहार आहे. विवाहित झाल्यापासून संसार आपल्या मागे लागला आहे. प्रपंच मागे लागला आहे. प्रपंच आणि तंटा आणि मंदिर आणि घंटा याविषयी एक म्हणच प्रसिद्ध आहे ती अशी-देवळात घंटा आणि प्रपंचायत तंटा ।'ा संसाराला कोणी दु:खमूळ म्हणतात तर कोणी खोटा म्हणतात, पण कवयित्री बहिणाबाई म्हणतात, संसार खोटा म्हणू नाही असे सांगताता.अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नाही ।देवळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नाही ।।तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या संत आणि कवींनी कवयित्रींनी संसारात वर्णन केलेले आहे.आता मंडळी एक आहे की संसाराची, इच्छा, कामनांची पूर्तता कधी होत नाही. संसाराला अंत नाही जो मनुष्य आपल्या मनावर विजय मिळवितो त्यालाच या जगात परम सुख मिळते व त्याचा संसार पूर्णत्वाला जातो.आता संसार म्हणजे विविध प्रकारची दैनंदिन कामे, नित्य कामे नैमित्तिक कार्ये याच्या शिवाय संसार होतच नाही. मग धर्मशास्त्राने संसारामध्ये राहून परमेश्वराच्या नाम जपाचे, किर्तनाचे, कथा श्रवणाचे नियोजन करायला सांगितले आहे.आपण दैनंदिन कामाचे नियोजन विवाह, मौंज, बारसे, डोहाळे जेवण अशा नैमेतिक कामाचे नियोजन अत्यंत बारकाईने करत असतो तसेच नियोजन. सनातनी ऋषीमुनींनी सांगितले आहे ते पुढीलप्रमाणे-शतं विहाय भोक्तव्यं सहस्त्र स्रानमाचरेत् ।लक्षं विहाय दातव्यं कोटि त्यक्त्वा हरिभजेत् ।।अर्थ :- माणसाने शंभर कामे सोडून जेवण करावे. हजार कामे सोडून स्रान (आंघोळ) करावे. एक लाख कामे सोडून दान करावे आणि कोटी कामे सोडून भगवंताचे स्मरण करावे.यात सर्वाधिक संख्या कोटी आहे. म्हणून मनुष्याने आपल्याला मिळालेल्या या श्रेष्ठ अश्या मानव शरीराने भगवंताची सेवा करावी, मुखाने नामचिंतन करावे, पायाने पंढरीची वारी करावी, हाताने भगवंताच्या किर्तनात नाम जपात टाळी वाजवावी. डोळ्यांनी भगवंताचे सुंदर ध्यान करावे. मन भगवंताच्या ठायी लीन करावे म्हणूनच संत म्हणतात.नाम संकिर्तन साधन पै सोपेजळतील पापे जन्मांतरीचीन लभती सायास जावे वनांतरासुखे येतो घरा नारायणठायीच बैसोनी करा एकचित्तआवडी अनंत आळवावा ।तुका म्हणे सोपे आहे सर्वाहूनीशहाणा तो धनी घेतो येथेकवयित्री बहिणाबाई म्हणतात जे तोंड देवाचे नाव घेत नाही त्याला तोंड म्हणू नये.हरी नामाईन बोलो। त्याले तोंड म्हणू नई ।मराठी सुभाषित कार वर्णन करतात.अहो येता जाता, उठत बसता कार्य करिता ।सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता ।।घरी दारी शय्येवरी रतिसुखाचे अवसरी ।समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी ।।अशा प्रकारे नाममहात्म्य सर्व संतांनी सांगितले आहे. श्रीमद् भागवत ग्रंथांची समाप्ती सुद्धा नाम संकिर्तनाने (नाम - माहात्माने) झालेली आहे.श्लोक : भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते ।तथा कुरुष्व देवेष नाथस्त्वनो यत:प्रभो ।।नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनं ।प्रणामो दु:ख शमनस्त्वं तं नमामि हरिपरम् ।।अर्थ :- हे भगवान श्रीकृष्णा तुझ्या चरण कमलावर आमचा भक्तीभाव व उत्पन्न होऊ दे.आमच्या मुखातून सदैव तुझे नाम येत राहो कारण तुझे नामसंकिर्तन सर्व प्रकारच्या दु:खाचा नाश करणारे आहे. म्हणून आम्ही अत्यंत श्रेष्ठ अशा तुझ्या चरण कमलांना वारंवार नमस्कार करतो.चला तर मग ! आपणही भगवंताचे नामस्मरण करून या संसाररूपी भवसागरातून जाऊ या !- दादा महाराज जोशी, जळगाव
नाम संकिर्तन साधन पै सोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 9:35 PM