चंद्रशेखर जोशीजळगाव : निवडणुका आणि तत्व हे समिकरणाचा आता दूरदूरवर संबंध उरलेला नाही. याची प्रचिती महापालिका निवडणुकांच्या दरम्यान व त्यानंतर राजकीय पक्षांच्या कार्यक्षेत्रात पहायला मिळाली. काही पक्ष हे तत्वसोडून राजकारण करत नसत. आज त्यांची स्थिती पहाता तत्वाशी काहीही संबंध नाही असेच अनुभव येतायं. तत्वांचा विचार करता. भाजपाबाबत अनेक जण अतिशय चांगल्या भूमिका मांडत. निवडणुकीत यश आले नाही तरी चालेल पण तत्वाशी तडजोड नको अशीच भूमिका पक्षाची व पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्ते व नेत्यांची असायची. यात उदाहरणच द्यायचे झाले तर उमेदवारीवरून होणाºया वादांची. उमेदवारी मिळावी, आपल्यालाही संधी मिळावी अशी प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असते. ती पूर्ण न झाल्यास जे खरोखर तत्वनिष्ठ असतात ते हिरमुसतात, नाराज होतात पण शांत बसून कामाला लागतात. पण ज्यांच्यातील महत्वाकांक्षा जागृत झाली असेल ते शांत बसत नाहीत. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच याच जीद्दीने ते काम करतात व बंडखोरी करतात. आम्ही आयुष्यभर सतरंज्याच उचलायच्यात का? अशी त्यांची भावना असते. पूर्वी अशी भूमिका असलेल्यांना स्थानिक प्रमुख पदाधिकारी बंडखोरीची शिक्षा काही दिवसातच द्यायचे. निवडणुकीच्या काळातच संबंधीतास पक्षातून काढायचे किंवा निवडणूक लढवत असलेल्या या व्यक्तीचा आता पक्षाशी काहीही संबंध नाही असे जाहीर केले जात असे. मात्र आज या उलट परिस्थिती दिसून येत आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करूनही नेतृत्व करणारे पदाधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेतात. पक्षाविरोधात बंडखोरी केली तरी आपल्या बंडखोर आपल्या कामाचा आहे. पुढची निवडणूक आपली आहे, त्यावेळी साथ मिळणार नाही. अशी भूमिका नेते मंडळी घेतात. ही भूमिका बंडखोरांना फावते. आपले कोणी काही बिघडवू शकत नाही... अशी भूमिका यामुळे बळावते आहे. त्यामुळे तत्ववगैरे सब झुट...बंडखोरीच्या नावाने चांगभल अशीच परस्थिती राजकीय पक्षांच्या पातळ्यांवर दिसत आहे.
बंडखोरीच्या नावाने चांगभल...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 11:24 PM