पारोळा, जि.जळगाव : रेशन दुकानात इपीडीएस प्रणाली सुरू झाली. काळ्याबाजारात जाणारे रेशन मालाला चाप यामुळे बसला. अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून अनेक चुकीचे नावे या यादीत आली. गरजू, गरीब लाभार्थी या योजनेत वंचित राहिले आणि धनदांडग्याची नावे या यादीत आली, पण ग्रामसभेत ही चुकीची नावे रद्द करून खरे लाभार्थी निवडा आणि त्यांचा हक्काचा रेशन माल खऱ्या लाभार्थीपर्यंत पोहोचवा, अशा सूचना आमदार डॉ.सतीश पाटील यांनी उपस्थित रेशन दुकानदारांना दिल्या.यावेळी रेशन दुकानदारांना काही अडीअडचणी आहेत का, याबाबतही आमदार पाटील यांनी माहिती जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याबाबत तहसीलदार खरमाळे यांना सूचना दिल्या.हिरापूर येथील रेशन दुकानदाराच्या बाबतीत मात्र तक्रारींचा पाऊस पडला, यात आमदार पाटील यांनी पुढच्या बैठकीत या गावातून एकही तक्रार नको, झालेल्या तक्रारींचा निपटारा लवकर करा, अशा सूचना संबधीतांना दिल्या.यावेळी तालुक्यातील पाच रेशन धान्य दुकानदारांची धान्य वाटपात अनियमितता आणि पॉस मशीनद्वारे धान्य वाटप न होण्याच्या तक्रारी प्राप्त होताच या सर्व दुकानदारांना तिसरी अंतिम नोटीस बजावून या दुकानाचे परवाने रद्द करण्याचा सूचना आमदार पाटील यांनी तहसीलदार वंदना खरमाळे यांना दिल्या.प्रत्येक रेशन दुकानदारांनी पूर्वी मयत झालेले, गाव सोडून गेलेले, अन्नसुरक्षा योजनेत, अंत्योदय योजनेत यातील सर्व बोगस लाभार्थिंची नावे कमी करून १५ आॅगस्टच्या होणाºया ग्रामसभेत ठरावाद्वारे खरे गरजू लाभार्थी निवडा आणि त्यांची नावे समाविष्ट करा, असे सांगत चुकीच्या पद्धतीने काम करणाºयांची गय मात्र केली जाणार नाही, अशा शब्दात आमदार पाटील यांनी रेशन दुकानदारांना सूचना वजा तंबी दिली.या वेळी नगराध्यक्ष करण पाटील, माजी जि.प.सदस्य पांडुरंग पाटील, पं.स.सदस्य ज्ञानेश्वर पाटील, समिती सदस्य दीपक अनुष्ठान, माणिक जैस्वाल, अरुण चौधरी, विनोद पाटील, वैशाली गुणवंत पाटील, वैशाली मेटकर,मोहिनी पाटील, माजी उपसभापती दीपक पाटील, बाळू पाटील, रॉकेल असो.चे तालुकाध्यक्ष अशोक पाटील, रेशन दुकानदार असो.चे तालुकाध्यक्ष भास्करराव पाटील, तहसीलदार वंदना खरमाळे, गटविकास अधिकारी आर.के.गिरासे, पुरवठा अधिकारी अनिल पाटील बी.टी.पाटील, प्रकाश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन अनिल पाटील यांनी केले
अन्नसुरक्षा योजनेत श्रीमंतांची नावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 1:29 AM