लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - मुळजी जेठा महाविद्यालयाच्यावतीने मंगळवारी राष्ट्रीय स्तरावरील मेस्ट्रो स्पर्धा घेण्यात आली. यात जाहिरात विकास स्पर्धेत नम्रता ठाकूर हिने तर प्रश्नमंजुषा स्पर्धेत अनुज महाजन व पोस्टर मेकिंग स्पर्धेत सुहासी जैन हीने बाजी मारली आहे. या विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले आहे.
मूळजी जेठामहाविद्यालयाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतर्फे ऑनलाइन मेस्ट्रो स्पर्धा मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.आर. चिरमाडे होते. तर कार्यक्रमाला डॉ. विजया शेट्टी, डॉ.स.ना.भारंबे, डॉ. ए. पी सरोदे, डॉ. संगीता पाटील, वाय.ए.सैंदाणे, डॉ.के.पी.नंदनवार, प्रा.एस.पी. पालवे,सी.ए. ए.के. आरसीवाला आदी उपस्थित होतेक़ार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ए.पी.सरोदे यांनी केले. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्या विजया शेट्टी यांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्याला वाव देण्यासाठी स्पर्धा महत्त्वाच्या असतात. त्यामुळे उत्साह वाढतो आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो असे प्रतिपादन केले. सूत्रसंचालन प्रा. जस्मीन गाजरे यांनी तर आभार प्रदर्शन सी.ए ए.के आरसीवाला यांनी केले.
चार प्रकारात झाली स्पर्धा
या ऑनलाईन स्पर्धेत पोस्टर मेकिंग, जाहिरात विकास, प्रश्नमंजुषा आणि पावर पॉइंट सादरीकरण या प्रकारांचा समावेश होता. कोरोनाची स्थिती पाहता, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, जळगाव नाशिक आदी विभागातील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने सहभाग नोंदविला होता. यावेळी स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना डॉ. प्रशांत वारके यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभाचे आभार डॉ.पी. एम जोशी यांनी केले.
असे आहेत विजेते
जाहिरात विकास या स्पर्धेत प्रथम नम्रता शिवाजी ठाकूर, द्वितीय अथर्व दीपक देशपांडे, तृतीय सुहासिनी सुशील जैन., पीपीटी स्पर्धेत प्रथम- सर्वेश नरेश बाविस्कर, द्वितीय महेक जयस्वाल, तृतीय तेजस्विनी माळी., प्रश्नमंजुषा ऑनलाइन स्पर्धेत प्रथम अनुज महाजन, द्वितीय सुहास जैन, तृतीय साक्षी चौधरी., पोस्टर मेकिंग स्पर्धेत प्रथम सुहासी जैन, द्वितीय इंसिया मुतुर्जा बोहरी, तृतीय निकिता शर्मा ठरली आहे.