लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड, ता. धरणगाव : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये नांदेड व साळवा ग्रामपंचायतीत मतदारांनी नवख्या उमेदवारांना कल दिल्याचे दिसून येत आहे.
धरणगाव तालुक्यातील नांदेड, साळवा या मोठया ग्रामपंचायतींसह नारणे येथीलही ग्रा. पं. ची निवडणूक अतिशय अटीतटीची व चुरशीची झालेली होती. निवडून आलेले उमेेदवार व प्रभाग असे-नांदेड-प्रभाग १मधून रमेश गोबा कोळी, संजय नामदेव सैंदाणे, सुनिता विनोद सैंदाणे, प्रभाग दोनमधून वंदना संजय कोळी, चारूशीला मोहन बऱ्हाटे, प्रभाग तीन सुनिल चिंतामण सैंदाणे, सुषमा राजेश अत्तरदे, प्रभाग चार तेजस पुरुषोत्तम चौधरी, सुरेखा राजू भिल्ल, पुनम प्रशांत अत्तरदे, प्रभाग पाच भुषण राजेंद्र अत्तरदे, शोभा दिलीप नेमाडे, विजया भानुदास रडे.
साळवा : साळवा येथील प्रभाग एकमधून बैमागीअलीम पटेल, ईशा मोरेश्वर इंगळे, सतीष कृष्णा पवार, प्रभाग दोन कुंदन किशोर इंगळे, योगिनी हेमंत नारखेडे, प्रभाग तीन मनोज सोपान अत्तरदे, माधुरी लोमेश नारखेडे, प्रभाग चार शरद ज्ञानदेव कोल्हे, मनीषा सचीन सोनवणे, चंद्ररेखा सतीष पवार, प्रभाग पाच भुषण यतीन बऱ्हाटे, कल्पना पंढरीनाथ इंगळे, आशा संजय कोल्हे हे विजयी झाले आहेत.
नारणे येथील प्रभाग एकमधून सुमनबाई सुकदेव मराठे, आनंदा दशरथ भिल्ल तर सविता विजय कोळी याआधीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. प्रभाग २मधून मिनाक्षी नरेंद्र पाटील, रविंद्र एकनाथ चव्हाण तर प्रभाग ३मधून विकास चुडामण बाविस्कर, पुनम निंबा सोनवणे हे निवडून आले आहेत. तहसिलदार नितिनकुमार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गणेश बिऱ्हाडे यांनी काम पाहीले.