नंदुरबार : वायफाय सेवा सुरू करणारे नंदुरबार हे राज्यातील पहिले शहर ठरणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर 26 जानेवारीपासून दोन ठिकाणी ही सेवा सुरू होत आहे. नंदुरबार शहर वायफाय बनविण्याचा संकल्प पालिकेने केला आहे. त्यासाठी विविध पातळींवर अभ्यास करण्यात आला. त्यानुसार प्रायोगिक तत्वावर नंदुरबारात सोनारखुंट परिसर व गिरिविहार गेट परिसरात ही सेवा सुरू होणार आहे. त्यानंतर शहरातील विविध भागात ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. वायफाय सेवा देणारी राज्यातील नंदुरबार ही पहिलीच पालिका ठरणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. 26 जानेवारी रोजी औपचारिकरित्या त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
नंदुरबार पहिले वायफाय शहर
By admin | Published: January 21, 2016 12:43 AM