शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

अडकलेल्या परप्रांतीयांसाठी धावली नाशिक- लखनऊ श्रमिक एक्सप्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2020 3:32 PM

लॉकडाऊनमध्ये तब्बल ३८ दिवसांनंतर प्रथमच भुसावळ रेल्वेस्थानकावरून नाशिक येथे अडकलेल्या परप्रांतीयांसाठी नाशिक रोड-लखनऊ श्रमिक एक्स्प्रेस धावली.

ठळक मुद्दे दिलासादायकभुसावळ स्थानकावर जेवणाची पाण्याची झाली व्यवस्था

वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : कोरोना संसर्ग होऊ नये याकरिता रेल्वे प्रशासनातर्फे रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. लॉकडाऊनमध्ये तब्बल ३८ दिवसांनंतर प्रथमच भुसावळ रेल्वेस्थानकावरून नाशिक येथे अडकलेल्या परप्रांतीयांसाठी नाशिक रोड-लखनऊ श्रमिक एक्स्प्रेस धावली. भुसावळ रेल्वेस्थानकावर प्रवाशांची जेवणाची व पाण्याची सोय करण्यात आली.लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या परप्रांतीय विशेषत: उत्तर भारतीयांना आपल्या प्रांतात जाण्यासाठी विशेष गाडी सोडण्यात येईल, या आशेपोटी गेल्या दीड महिन्यापासून उत्तर भारतीय तग धरून होते. लॉकडाऊन-२ वाढल्यानंतर तर परप्रांतीयांचा संयम सुटला व अनेक परप्रांतीयांचे जथेच्या जथ्थे पायी गावाकडे निघाले होते. नाशिक येथे अडकलेला परप्रांतीयांची शासन दरबारी नोंद झाल्यानंतर गाडी क्रमांक ०२१२१ नाशिक रोड-लखनऊ विशेष श्रमिक गाडी परप्रांतीयांसाठी सोडण्यात आली. गाडीला १७ डबे जोडण्यात आले. यात १२ स्लीपर, तर ४ सामान्य श्रेणीचे डबे जोडण्यात आले. ८३९ प्रवाशांना याद्वारे सोडण्याची व्यवस्था करण्यात आली. नाशिक ते थेट लखनऊच्या प्रवाशांनाच गाडीमध्ये प्रवेश देण्यात आला. नाशिकशिवाय गाडीला भुसावळ, खंडवा, इटारसी, बिना, झांशी, कानपूर याठिकाणी फक्त तांत्रिक थांबा देण्यात आला आहे. या स्थानकावरून कोणीही प्रवाशांना प्रवेश तसेच उतरण्याची परवानगी नाही.सोशल डिस्टन्सिंग पाळत व सॅनिटाईज होऊन धावली गाडीकोरोनाच्या पाशर््वभूमीवर संसर्गाची लागण होऊ नये याकरिता गाडीच्या एका ७२ प्रवाशी क्षमता कोचमध्ये, फक्त ५२ प्रवाशांना बसविण्यात आले. गाडीला पूर्णत: सॅनिटाईज करण्यात आले असून सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवण्यात आले आहे. प्रत्येक प्रवाशाला मास्क लावण्यात आले होते.भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे जेवणाची पाण्याची सोयलांब पल्ल्याच्या या श्रमिक गाडीमधील प्रवाशांसाठी भुसावळ रेल्वेस्थानकावर गाडी प्लॉट क्रमांक सहावर शनिवारी दुपारी दीडला आल्यानंतर तब्बल ८५० फूड पाकिटे तसेच हजारांपेक्षा जास्त पाण्याच्या बाटल्या प्रवाशांना रेल्वे प्रशासनातर्फे वितरित करण्यात आल्या. दुपारी १:५५ वाजता गाडी भुसावळ रेल्वे स्थानकावरून सुटली. दरम्यान संपूर्ण गाडीला भुसावळ रेल्वेस्थानकावर सॅनिटाईज करण्यात आले.स्टेशन निर्देशक जी.आर.अय्यर, मुख्य वाणिज्य निरीक्षक सुदर्शन देशपांडे, मुख्य तिकीट निरीक्षक वि के.सचान, स्टेशन रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक दिनेश नायर, मुख्य पार्सल परीवेक्षक एच. जी आव्हाड, खानपान निरीक्षक शकील खान, जीआरपी पोलीस निरीक्षक दिनकर डंबाळे व अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होते.दरम्यान, १ मे रोजी रात्री गाडी क्रमांक ०२१५३ ही सात डब्यांची नाशिक रोड ते भोपाळ गाडी मध्य प्रदेशातील अडकलेल्या परप्रांतीयांसाठी सोडण्यात आली. रात्री १२:३० वाजता गाडी भुसावळ रेल्वेस्थानकावरून धावली.विषय गाड्यांचे फक्त तांत्रिक थांबेया सुरुवातीच्या स्थानकावरून गाडी सोडण्यात येत आहे. तेथून तर थेट शेवटच्या स्थानकावरील प्रवाशांना गाडी प्रवेश देण्यात येत आहे. मधल्या स्थानकावर फक्त गाडीला तांत्रिक थांब्यासाठी थांबविण्यात येत आहे. यात या स्थानकावरून इतर कोणतेही प्रवासी चढू वा उतरू शकणार नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBhusawalभुसावळ