जळगाव : नाशिक येथील श्रमिकनगरात वास्तव्यास असलेल्या रितेश राजेंद्र लाडवंजारी-घुगे (२१) या तरुणाने जळगाव तालुक्यातील मावस भाऊ ललित घुगे यांच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६़४५ वाजता उघड झाली आहे़ आत्महत्तेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही़ मात्र, आत्महत्या करण्यापूर्वी हाताची नस कापण्याचा प्रयत्न केल्याचेही पोलीस तपासात आढळून आले़ याप्रकरणी मामा राजेंद्र शंकर पालवे (रा़ मुक्ताईनगर) यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.रितेश लाडवंजारी हा तरुण नाशिक येथे कुटुंबीयांसोबत वास्तव्यास होता़ रितेश याचे मेहरूण येथेही घर होते तर मावस भाऊ ललित घुगे हा चिंचोली येथे वास्तव्यास आहे़ गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास रितेश हा दुचाकीने (एमएच़१५़एफ जी़३०९३) चिंचोली येथे येण्यासाठी निघाला़ मात्र, तो चिंचोली शिवारातीलच मावस भावाच्या शेताकडे गेला़ नंतर त्याने हाताची नस कापून शेतातील विहिरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपविली.विहिरीशेजारी आढळली दुचाकीशुक्रवारी सकाळी रितेश याचा मावस भाऊ ललित घुगे हा शेतात आला़ त्यावेळी त्यास रितेश याची दुचाकी विहिरीच्या शेजारी दिसून आली़ नंतर विहिरीत डोकवून पाहिले असता त्यात त्याची चप्पल दिसली़ त्यांनी लागलीच मुक्ताईनगर येथील राजेंद्र पालवे यांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली़ त्यानुसार सकाळी १० वाजता पालवे हे घटनास्थळी पोहाचताच त्यांना विहिरीजवळ गर्दी बघायला मिळाली़ पोलिसांनी विहिरीतून मृतदेह काढताच तो भाचा रितेश याचा असल्याचे ओळखले.पोलिसांची घटनास्थळी धावविहिरीत उडी मारून तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती कळताच सहायक पोलीस अधीक्षक डॉ़नीलाभ रोहन यांच्यासह एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे, जितेंद्र राजपूत, विजय नेरकर, अतुल पाटील, किशोर बडगुजर, दीपक चौधरी, भूषण सोनार आदी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली तसेच पोलीस पाटील मुकेश पोळ यांचीही उपस्थिती होती़ तसेच मृतदेह बाहेर काढण्यात आला़ दुचाकीची पाहणी करताना त्यांना रितेश याच्या आई-वडिलांचा मोबाईल क्रमांक आढळून आला आहे.
नाशिकच्या तरुणाची चिंचोलीत विहिरीत उडी मारून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 8:05 PM