आॅनलाईन लोकमतनशिराबाद,ता.जळगाव,दि.२ : एळकोट एळकोट जय मल्हार, खंडेराव महाराज की जयच्या जल्लोषात हळदीचा भंडारा उधळत नशिराबादला खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त बारागाड्या ओढण्याचा सोहळा उत्साहात झाला. सुमारे दोन शतकांची परंपरा यात्रोत्सवास आहे.यात्रोत्सवानिमित्त रविवारी खंडेराव महाराजांच्या मूर्तीस अभिषेक पूजन झाले. सायंकाळी प्रथमत: बारागाड्यांचे विधिवत पूजन झाले. त्यानंतर भगत सुदाम दामू धोबी यांनी कुंभार दरवाजापासून खंडेराव महाराज मंदिरापर्यंत बारागाड्या ओढल्या. राजेंद्र चौधरी, मोहन येवले,सुदाम कोळी, मंगल चौधरी, युवराज धोबी, सुदाम कोळी, सुकदेव भोई, प्रकाश चौधरी, हेमंत धोबी, मिलिंद देशपांडे यांनी सहकार्य केले.कठडे मिरवणूक निघाली. रात्री चंदाबाई रावेरकर यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम झाला. उत्सव समितीचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य लालचंद पाटील, योगेश पाटील, ज्ञानदेव लोखंडे, सरपंच विकास पाटील, पंकज महाजन, उपसरपंच कीर्तीकांत चौबे, किशोर पाटील, किरण पाटील आदींनी परिश्रम घेतले.डोळ्याचे पारणे फेडणारा हा सोहळा पाहण्यासाठी नशिराबादसह परिसरातील गावातील ग्रामस्थाननी गर्दी केली होती. महिला-पुरुषांसह आबालवृद्धांची संख्या मोठी होती. धोबी घराण्याकडे गेल्या सहा पिढ्यांपासून बारागाड्या ओढण्याची परंपरा आहे. स.पो.नि. आर.टी.धारबळे, पोलीस उपनिरीक्षक अशोक खरात व पोलिसांनी बंदोबस्त ठेवला.
हळदीचा भंडारा उधळत नशिराबादला बारागाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 4:11 PM
खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त भाविकांचा अपूर्व उत्साह
ठळक मुद्देनशिराबादच्या यात्रोत्सवाला दोन शतकांची परंपराखंडेराव महाराजांच्या मूर्तीस अभिषेक व पूजनधोबी घराण्याकडे गेल्या सहा पिढ्यांपासून बारागाड्या ओढण्याची परंपरा