नशिराबाद : महामार्ग चौपदरी करण्याच्या कामाने गती घेतली आहे. चौपदरीकरण्याच्या कामासाठी वाढीव भूसंपादन करण्यासाठी हालचाली सुरू आहे. त्याकरिता सोमवारी जागा मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना काहींनी सहमती तर अनेकांनी विरोध दर्शवला. यापूर्वी संपादित केलेल्या जागेतच महामार्गाचे काम करावे नव्याने पुन्हा भूसंपादन करू नका, असा आग्रह भूसंपादीतन होणाºया नागरिकांनी केला. पुन्हा वाढीव भूसंपादन झाल्यास त्यामुळे होणाºया अडचणी व्यथांचा पाढा नागरिकांनी मांडला.नशिराबाद महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. चौपदरीकरणासाठी गरजेनुसार वाढीव भूसंपादन करण्याचे हालचाली गतिमान झाले आहे. त्यानुसार गेल्या आठवड्यात संबंधित शेती,प्लॉट, धारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानुसार वाढीव भूसंपादनासाठी मोजणीला सोमवारी संबंधित विभागाचे अधिकारी वर्ग आले होते. त्यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. वाढीव भूसंपादनाला विरोधाची कारणे कथन केले. तर काहींनी मोजणी करा आमची सहमती आहे असे सांगितले असल्याची माहिती अधिकारीवर्गाने दिली. यापूर्वी संपादित जागेतच महामार्गाचे काम करावे पुन्हा वाढीव भूसंपादन करू नका. असे सांगत मोजणीला हरकत घेतली. अधिकारी वर्गाने त्याचा पंचनामा केला. उपअधीक्षक भूमिअभिलेख भूमापक प्रफुल्ल पाटील, नही विभागाचे सहाय्यक सहकारी शशीभूषण जोशी यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. सरपंच विकास पाटील, माजी सरपंच पंकज महाजन, गणेश पाटील, विनायक धर्माधिकारी, बंडू भोळे,आरिफ शेख, शरद महाजन, अशोक महाजन, दीपक कोष्टी ,गिरीश रोटे, समीर दीक्षित, सुबोध चौधरी,छबीलदास खडके, लक्ष्मण महाजन, हितेश महाजन, संजय चौधरी आदी उपस्थित होते.वाढीव भूसंपादनाने होणार नुकसानवाढीव भूसंपादन झाल्यास संबंधित शेतकरी, प्लॉटधारक, घर यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. आधीच भूसंपादन झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचा आक्षेप नागरिकांनी घेतला. काही ठिकाणी असलेले व्यवसाय चालक याचे जागा भूसंपादनात गेल्यास उदरनिर्वाहाचा यक्ष प्रश्न उभा राहणार असल्याचा दावा उपस्थित नागरिकांनी केला. त्यामुळे वाढीव भूसंपादन करू नका अशी आग्रही मागणी भूसंपादित होणाºया नागरिकांनी केली. गेल्या सहा-सात महिन्यांपूर्वी ही नही विभागाला वाढीव भूसंपादन करू नका या संदर्भात निवेदने दिली होती.-वाढीव भूसंपादन झाल्यास नशिराबाद लगत असलेल्या दोन्ही बाजूंच्या व्यवसायिक, प्लॉटधारक, शेतकरी, दुकानदार यांच्या मोठे नुकसान होऊन घरांची तोडफोड करावी लागणार आहे. त्यामुळे वाढीव भुसंपादन होऊ नये अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.-सहमती दर्शविलेल्या नागरिकांच्या भूसंपादनाची मोजणी केली असता काही ठिकाणी वाढीव भूसंपादनाची गरज नसल्याचे निदर्शनास आले.
महामार्ग वाढीव भूसंपादनाला नशिराबाद ग्रामस्थांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 12:34 PM