जळगाव - महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ तथा बालभारतीचे मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश लक्ष्मण पाटील यांना रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल यांच्यातर्फे नेशन बिल्डर अवॉर्डने गौरवण्यात आले.शाळासिद्धी राज्य निर्धारक तथा जळगाव जिल्हा संपर्क अधिकारी, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथील मूल्यमापन तज्ज्ञ, महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाचे अभ्यास मंडळ सदस्य यासह शिक्षणक्षेत्रातील विविध ठिकाणी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. जगदीश पाटील यांना रोटरी क्लब जळगाव सेंट्रल यांच्यातर्फे नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पी. पी. माहूलीकर, सिनेट सदस्य विष्णू भंगाळे, रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलचे अध्यक्ष डॉ. अपर्णा भट कासार व सचिव राजेंद्र बर्डे यांच्या हस्ते हा पुरस्कार डॉ. जगदीश पाटील यांना प्रदान करण्यात आला. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
नेशन बिल्डर अवॉर्डने डॉ. जगदीश पाटील सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 20:26 IST