जळगाव : एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालय व एआयसीटीई (नवी दिल्ली) व आयएसटीई यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच ऑनलाइन मशीन लर्निंग व पॅटर्न रेकग्निशन या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. डी. एस. पाटील, प्राचार्य डॉ. के. एस. वाणी, उपप्राचार्य डॉ. एस. पी. शेखावत, डॉ. एस. आर. सुरळकर, समन्वयक डॉ. पी. एच. झोपे व प्रा. एन. एम. काझी उपस्थित होते. उद्घाटनानंतर कार्यशाळेला सुरुवात होऊन डॉ़ डी.एस. पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत या विविध राज्यातून शंभर प्राध्यापक, संशोधन, स्नातकांनी सहभाग नोंदविला होता. यशस्वीतेसाठी प्रा. एन. एम. काझी, प्रा. अमोल वाणी, प्रा. अतुल करोडे, प्रा. धनेश पाटील, प्रा. नीलेश महाजन प्रा. सतपाल राजपूत आदींनी परिश्रम घेतले.