भुसावळ, जि.जळगाव : येथील भोळे महाविद्यालयात २३ रोजी ‘चॅलेंजेस अॅण्ड अपॉर्च्युनिटीज इन अनआॅर्गनाइज्ड सेक्टर इन पोस्ट कोविड एरा’ या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले.वेबिनारचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप रामू पाटील यांच्या हस्ते झाले. प्राचार्य डॉ.आर.पी. फालक यांनी वेबिनारमध्ये सहभागी प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय वेबिनारच्या प्रथम सत्रात आरटीएम नागपूर विद्यापीठातील सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठ प्राध्यापक डॉ.श्रीनिवास खांदेवाले यांनी, तर द्वितीय सत्रात व्हीबीएस पूर्वांचल विद्यापीठ, जौनपूर (उत्तर प्रदेश) येथील व्यवस्थापन विद्याशाखेचे डीन प्रा.डॉ.अविनाश पाथर्डीकर यांनी ‘चॅलेंजेस अॅड अपॉर्च्युनिटीज इन अनआॅर्गनाइज्ड सेक्टर इन पोस्ट कोविड एरा’ या विषयावर सखोल संशोधनात्मक व्याख्यान देऊन उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. समारोप सत्रात प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी उपस्थितांना संबोधित केलेभोळे महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र आणि वाणिज्य विद्याशाखेच्या विषयांनी सामाईकरित्या आयोजित केलेल्या या वेबिनारमध्ये सत्र चेअरमन म्हणून भुसावळ येथील भोळे महाविद्यालयातील प्रा.अंजली पाटील यांनी काम पाहिले. समारोप सत्रात प्रातिनिधिक मनोगत प्रा.डॉ.विजयकुमार वानखेडे (जळगाव) आणि प्रा.विनोदकुमार पठाडे (नाशिक) यांनी व्यक्त केले.वेबिनारमध्ये देशभरातून ४२५ संशोधक आणि प्राध्यापक सहभागी झाले होते. वेबिनार आयोजनासाठी कन्व्हेनेर म्हणून प्रा.डॉ.आर.एम.सरोदे, सहआयोजक म्हणून प्रा.डॉ.जयश्री सरोदे, समन्वयक म्हणून प्रा.संगीता धर्माधिकारी, तर आयोजन सचिव म्हणून प्रा.डॉ.दयाघन एस.राणे यासह प्रा.दीपककुमार जैस्वार, प्रा.अंजली पाटील, प्रा.माधुरी पाटील आणि महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले, असे प्रसिद्धी प्रमुख प्रा.डॉ.संजय डी.चौधरी यांनी सांगितले.
भुसावळच्या भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय वेबिनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 7:17 PM
भोळे महाविद्यालयात २३ रोजी ‘चॅलेंजेस अॅण्ड अपॉर्च्युनिटीज इन अनआॅर्गनाइज्ड सेक्टर इन पोस्ट कोविड एरा’ या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले.
ठळक मुद्देवेबिनारमध्ये ४२५ संशोधक प्राध्यापकांचा सहभाग‘चॅलेंजेस अॅण्ड अपॉर्च्युनिटीज इन अनआॅर्गनाइज्ड सेक्टर इन पोस्ट कोविड एरा’ या विषयावर वेबिनार