चाळीसगाव : तसा तो हाडाचा पेंटर. कलाशिक्षणाची पदवी घेतल्याने तीन वर्षे विद्यार्थ्यांसाठी फळ्यावर चित्रेही चितारली. मात्र झीरो बजेट नैसर्गिक आणि विषमुक्त शेतीचा पर्याय समोर आल्यानंतर त्याने स्वत:च्या चार एकरात ठाण मांडले. आपली मूळं इथेच रुजवायची म्हणून पत्नीच्या साथीने नैसर्गिक शेतीचा अनोखा प्रयोग यशस्वी करुन दाखविला. ‘पेंटर बाबू’ ते प्रयोगशील शेतकरी असा समाधान ठुबे यांचा प्रवास आहे.चाळीसगाव शहरापासून अवघ्या आठ किमी अंतरावर दक्षिणेला पिंपरखेड शिवारात त्यांनी विषमुक्त जीवामृताच्या सहाय्याने शेती फुलवली आहे. समाधान यांचा हा समाधान देणारा प्रयोग पाहण्यासाठी राज्यभरातून शेतकरी येथे येतात. समाधान ठुबे यांचीही नैसर्गिक शेती प्रसारासाठी भ्रमंती सुरु असते.एकीकडे दुष्काळाचे चक्र. त्याच्यात भरीस भर म्हणून अवकाळी पावसाचे अधूनमधून बसणारे फटके. नापिकीच्या दुष्टचक्रात फसलेल्या शेतक-यांना गळ्याभोवती फास आवळण्याशिवाय पर्याय उरत नाही. याबरोबरच रासायनिक खतांची बेसुमार मात्रा जमिनीचीे पोषण मुल्येच संपवित असल्याने असे उत्पन्न खाणा-यांना अनेकविध आजारांचा विळखा पडला आहे. कर्करोगाने वर काढलेले डोके याचेच द्योतक असल्याचे मानले जाते. तथापि, अमरावतीस्थित पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी शेतक-यांना या चक्रातून बाहेर पडण्यासाठी 'झीरो बजेट' आणि पूर्णपणे विषमुक्त, नैसर्गिक शेतीचा सक्षम नवा मंत्र दिला आहे. ३८ वर्षीय समाधान ठुबे यांनी याच मंत्राची कास धरून आपल्या चार एकरात नैसर्गिक शेतीची विषमुक्त नवलाई फुलवून दाखवली आहे. २०१३ पासून ते नैसर्गिक शेतीकडे वळले असून गेल्या सात वर्षात लागवडीसाठी झालेला खर्च आंतर पिक उत्पान्नातून काढत ‘झीरो बजेट’ शेतीही करता येते हेच त्यांनी सिद्ध करुन दाखविले आहे.ठुबे यांना गत सात वर्षात सात लाखांचे उत्पन्न मिळाले असून तो त्यांचा थेट नफाच आहे. आपल्या बारावी उत्तीर्ण असलेल्या पत्नी शारदा यांच्यासोबत ते दिवसभर शेतात राबतात. विशेष म्हणजे चार एकर शेती दोघे पतीपत्नी मिळूनच करतात. कामासाठी एकही मजूर लावत नाही. ब-याचदा नैसर्गिक म्हणजे सेंद्रीय शेती असे ढोबळपणे म्हटले जाते. मात्र नैसर्गिक शेती हा पॅटर्न पूर्णपणे वेगळा आहे. म्हणूनच विषमुक्त शेती असाही त्याचा उल्लेख केला जातो.नैसर्गिक शेतीचे चार भरजरी पदरविषमुक्त नैसर्गिक शेतीचे चार पदर आहेत. त्यावरच या शेतीचा प्रयोग यशस्वी होतो. बीजामृत, जीवामृत, अच्छादन, वापसा. हीच विषमुक्त शेतीची चतु:सूत्री आहे. जीवामृत यातील महत्त्वाचा घटक. अर्थात चारही घटकांची परस्परांना पूरक असणारी साखळी आहे.असे तयार करतात जीवामृतनैसर्गिक शेतीसाठी लागणारे जीवामृत शेतातच तयार केले जाते. यासाठी गायीचे गोमूत्र, शेण, गूळ, बेसनपीठ यापासून एका टाकीत जीवामृत तयार करतात. यापासून ५०० कोटी जीवामृत तयार होऊन अच्छादनावर त्यांनी टाकलेल्या विष्टेद्वारा पिकांना पूर्णपणे विषमुक्त पोषणद्रव्ये मिळतात. मुख्य पिकासोबतच यावर झालेला जुजबी खर्च आंतरपिकातून काढला जातो. हाती येणारे मुख्य पीक विना खर्च असते. सध्या राज्यभर नैसर्गिक शेतीचे काही प्रयोग पथदर्शी ठरले आहेत. समाधान ठुबे हे शेतीमधून आलेल्या उत्पन्नाची स्वत: घरपोच सायकलवर फिरून विक्री करतात........भाजीपाला, डाळिंब आणि कपाशीचे घेतले उत्पन्नसमाधान ठुबे हे नैसर्गिक शेतीकडे कसे वळले हे रंजकच आहे. २० वर्षे त्यांनी पेंटर म्हणून काम करताना आपली उपजिविका चालवली. कला शिक्षकाची पदवी घेतल्यानंतर त्यांनी तीन वर्षे चित्रकला शिक्षकाची नोकरीही केली. पारंपारिक शेती करण्याऐवजी काहीतरी वेगळे करावे. या शोधातूनच ठुबे नैसर्गिक शेतीकडे वळले. आता ते पूर्णवेळ चार एकर शेती कसतात. गेल्या सात वर्षांत त्यांनी भाजीपाला, कांदा, डाळिंब, कापूस आदी पिके घेतली असून यावर्षी गव्हाचीदेखील लागवड केली आहे. यातून त्यांना सात लाखांचे उत्पन्न मिळाले. नैसर्गिक शेतीच्या प्रचारासाठी ते पदरझळ सोसून शेतक-यांच्या बांधापर्यंत पोहचता. शालेय विद्यार्थ्यांसमोरही नैसर्गिक शेती विषयी व्याख्याने देतात.सेंद्रीय शेती म्हणजेच विषमुक्त व नैसर्गिक शेती असा समज आहे. परंतू नैसर्गिक शेती हा पूर्णत: वेगळा प्रयोग आहे. पद्मश्री सुभाष पाळेकर हेच या प्रयोगाचे जनक असून गेल्या आठ वषार्पासून त्यांच्या मार्गदर्शनानुसार नैसर्गिक शेती करतो. यात यशस्वी झालो आहे.- समाधान ठुबे,शेतकरी, चाळीसगाव.