शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
3
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
4
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
5
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
6
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
7
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
8
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
9
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
10
पत्नी, वडिलांचा अपमान करणाऱ्याचा काढला काटा, पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशातून १ अटकेत
11
मार्गिकांसाठी आता वांद्रे-खार पादचारी पूल तोडणार, पश्चिम रेल्वेवरील हार्बरचे वेळापत्रक ६ महिने विस्कळीत राहणार
12
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
13
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
14
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
15
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
17
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
18
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
19
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
20
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा

काकाचे उत्तरकार्य आटोपून परतणाऱ्या नौदलातील अभियंत्याचा रेल्वेतून पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 11:58 AM

जळगाव जिल्ह्यातील घटना

ठळक मुद्देआजीच्या फोनमुळे पटली ओळखसुट्टी वाढविली आणि जीवावर बेतले

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ६ - उत्तरप्रदेशात काकाचे उत्तरकार्य आटोपून मुंबई येथे कामावर परतणाºया राहुलकुमार संतोषकुमार पाल (२४, रा. ठाकूर पूर्व, जि. कानपूर, उत्तरप्रदेश) या नौदलात अभियंता असलेल्या तरुणाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री रावेर ते वाघोड दरम्यान घनदाट जंगलात घडली. शुक्रवारी त्याची ओळख पटली व शनिवारी त्याचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.राहुलकुमार पाल हा मुंबई येथे नौदलात आयएनएस म्हैसूर बटालियन या जहाजावर अभियंता आहे. तो सुट्टी घेऊन गावाकडे गेला. मात्र याच दरम्यान त्याच्या काकाचे अपघाती निधन झाले त्यामुळे तो तेथेच थांबला. उत्तरकार्य झाल्यानंतर तो मुंबई येथे कामावर जाण्यासाठी गोरखपूर-एलटीटी एक्सप्रेसने निघाला असताना गुरुवारी मध्यरात्री रावेर ते वाघोड दरम्यान ४८५/१३/१५ कि.मी. खांबाजवळ रेल्वेतून पडला. जंगल परिसर असल्याने तो तेथेच पडून होता. त्यानंतर रेल्वे रूळ पाहणीदरम्यान रेल्वे कर्मचाºयांना मृतदेह आढळून आला. या बाबत भुसावळ स्थानकप्रमुखांनी भुसावळ लोहमार्ग पोलिसांना माहिती दिली. त्या वेळी सहायक फौजदार अनंत रेणुके, पो.कॉ. श्याम निखारे यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला.राहुलकुमार रेल्वेतून पडल्यानंतर तो अनोळखी म्हणून त्याची नोंद होती. घटनास्थळावर त्याच्या मोबाईल फुटलेल्या अवस्थेत आढळून आला. त्या वेळी त्याचे सिमकार्ड पोलिसांनी स्वत:च्या मोबाईलमध्ये टाकले व ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी या क्रमांकावर राहुलकुमारच्या आजीच्या (आईच्या आईचा) फोन आला व त्याची विचारणा करू लागली. त्या वेळी पोलिसांनी त्याची संपूर्ण माहिती घेतली व त्याची ओळख पटली. मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयात आणला आणि येथे त्याचे शवविच्छेदन करण्यात आले.सुट्टी वाढविली आणि जीवावर बेतलेराहुलकुमार हा सुट्टीवर गेला असताना काकांचे निधन झाल्याने त्याने सुट्टी वाढविली. यामुळे रेल्वेच्या आरक्षित तिकिटाची तारीख निघून गेली. त्यामुळे नंतर त्यास जनरल बोगीतून निघावे लागले व याच बोगीतून पडून राहुलकुमारचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मुंबईला नौदलात समजल्यानंतर राहुलकुमारचे सहकारी जळगाव जिल्हा रुग्णालयात पोहचले.वडीलही नौदलातराहुलकुमार याचे वडील संतोषकुमार पाल हेदेखील कोची येथे नौदलात आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते जळगावला यायला निघाले होते.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव