शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

राष्ट्रवादी आणि कांॅँग्रेस पक्ष उतरले रस्त्यावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2017 11:11 PM

नोटाबंदीच्या विरोधात आंदोलन : जामनेर, धरणगाव, एरंडोलमध्ये रास्ता रोको, थाळीनाद, जेल भरो

जामनेर/धरणगाव/ एरंडोल : केंद्र सरकारने नोटाबंदी लागू करून दोन महिने उलटले तरी शहरी तसेच ग्रामीण भागातील जनता, शेतकरी, व्यापारी यांचे हाल कायम असल्याच्या निषेधार्थ सोमवारी जामनेर, धरणगाव, एरंडोल, पहूर,   याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले. यात काही ठिकाणी रास्ता रोको, थाळीनाद, निदर्शने, तसेच जेलभरो आंदोलन करण्यात आले. बहुसंख्य ठिकाणी या आंदोलनाला जोरदार प्रतिसाद मिळाला. आंदोलनादरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने अनुचित प्रकार घडले नाहीत.एरंडोलला रास्ता रोको  आ. डॉ. सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणगाव चौफुलीवर  राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्यानी  रास्ता रोको आंदोलन केले.  यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. तालुकाध्यक्ष राजेंद्र देसले, अमित पाटील, नगरसेवक अभिजित पाटील, रवींद्र पाटील, संदीप वाघ, आर.ए. शिंदे,  डॉ.सुभाष देशमुख, रवी पवार, अॅड. अहमद सैयद, प्रशांत पाटील, दत्तू पाटील, रमेश पाटील, शेनफडू पाटील, ज्ञानेश्वर पाटील, डॉ. मगन पाटील, रामधन पाटील, भावलाल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, ज्ञानेश्वर महाजन, भाऊसाहेब पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.  ‘रास्ता रोको’नंतर आ. पाटील यांनी तहसील कार्यालयासमोर  सभा घेऊन विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार सुनीता ज:हाड यांना दिले. या वेळी आ.डॉ.सतीश पाटील नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करीत म्हणाले की, नोटाबंदीच्या निर्णयाचा  सामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, लहान व्यापारी यांना मोठा फटका बसला आहे. जामनेरात काँग्रेसचा मोर्चामराठा, मुस्लीम आरक्षणाच्या मागणीसाठी तसेच नोटाबंदीविरोधात काँग्रेसतर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चाचे तहसील कार्यालयात  सभेत रूपांतर झाले. तेथे  नोटाबंदीवर ज्योत्स्ना विसपुते यांनी टीकास्त्र सोडले. या वेळी तालुकाध्यक्ष अजय पाटील, किरण पाटील आदिंनीही मनोगत व्यक्त केले. नायब तहसीलदार दिनकर पाटील यांना निवेदन देण्यात आले. मोर्चामध्ये अमृत पाटील, अख्तरबी गफ्फार, शशी पाटील, जावेद रशीद, अशोक नेरकर, कैलास पालवे, गोपाळ राजपूत, शंकर राजपूत, विजय तंवर, रऊफ शेख, नाना पाटील, पिंटू चिप्पड, गफ्फार भंगारवाले, नटवर चव्हाण, अरुण भगत आदी नेते, पदाधिकारी उपस्थित होते.  पहूरमध्ये राष्ट्रवादीतर्फे रास्ता रोको पहूर येथे जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे  रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. संजय गरुड, डिगंबर पाटील, प्रा. शरद पाटील,  प्रदीप लोढा, मूलचंद नाईक, श्याम साबळे, सुनीता सूर्यवंशी, उषा सोनवणे, प्रतिभा पाटील, सोपान पाटील, भास्कर पाटील, भगवान पाटील, किशोर पाटील, सत्यवान पाटील, विवेक जाधव, योगेश भडांगे, विजय पांढरे, अशोक देशमुख, सुरेश सोनवणे, भिका पाटील, राजू चौधरी, गणेश शिंदे,  पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते. दरम्यान, 32 आंदोलकत्र्याना  अटक करण्यात येऊन नंतर त्यांची सुटका करण्यात आली.      (लोकमत ब्युरो)एकाच विषयावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतर्फे धरणगावात स्वतंत्र आंदोलनधरणगाव : नोटाबंदी या एकाच विषयावर सोमवारी येथे काँग्रेसतर्फे थाळीनाद तर राष्ट्रवादीतर्फे रास्ता रोको असे स्वतंत्र आंदोलन करण्यात आले. काँग्रेसच्या आंदोलनात प्रदेश सचिव डी.जी.पाटील, रतिलाल चौधरी, राजेंद्र न्हायदे, सुरेश भागवत चंदन पाटील, पांडुरंग सातपुते, सम्राट परिहार, परेश जाधव, मनोज कंखरे, ब्रिजलाल पाटील,  चारूशीला पाटील, सुलोचना वाघ, अरुणा कंखरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादीतर्फे रास्ता रोको करण्यात आले. याप्रसंगी तालुका अध्यक्ष रमेश पाटील, रवींद्र पाटील, कल्पना अहिरे,  विजय पाटील, नाटेश्वर पाटील, डॉ.नितीन पाटील, मधुकर रोकडे, सुनील चौधरी, शरद पाटील, रंगराव पाटील, डी.एस.पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.