शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

Nagar Panchayat Election Result 2022: “भाजप-शिवसेनेची छुपी युती होती”; बालेकिल्ल्यातील पराभवानंतर एकनाथ खडसेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 11:27 AM

Nagar Panchayat Election Result 2022: शिवसेनेचा झालेला मोठा विजय राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना आपल्याच बालेकिल्ल्यात जबर धक्का मानला जात आहे.

जळगाव: निमशहरी महाराष्ट्राचा भाग असलेल्या राज्यातील १०६ नगर पंचायतींपैकी ९७ पंचायतींचे निकाल (Nagar Panchayat Election Result 2022) जाहीर झाले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक २७ नगरपंचायतींवर वर्चस्व मिळविले. मात्र भाजपने जोरदार मुसंडी मारत सर्वाधिक ३८४ जागा जिंकल्या. काँग्रेसला तुलनेने फटका बसला आणि तो पक्ष तिसऱ्या क्रमांकावर तर मुख्यमंत्रिपद असलेली शिवसेना मात्र चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. यातच अत्यंत चुरशीच्या झालेल्या बोदवड नगरपंचायतीच्या निकालात शिवसेनेने मुसंडी मारली. नऊ जागांवर विजय मिळवत शिवसेनेने बोदवड नगरपंचायत ताब्यात घेतली. बालेकिल्ल्यात झालेल्या पराभवानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी, या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची छुपी युती होती, असा आरोप केला आहे. 

शिवसेनेचा झालेला मोठा विजय राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना आपल्याच बालेकिल्ल्यात जबर धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला ७ जागा आल्या, तर भाजपाला अवघी एक जागा मिळवता आली. ईश्वरचिठ्ठीने ही जागा भाजपाकडे आली. त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला. 

शेवटी पराभव तर पराभवच आहे

एक जागा ईश्वरचिठ्ठीने आणि एक जागा सहा मतांनी गमावली आहे. पण शेवटी पराभव तर पराभवच आहे. भाजप आणि शिवसेनेची छुपी युती होती. गिरीश महाजन आणि शिवसेनेच्या स्थानिक आमदारांमध्ये तीन दिवसांपूर्वी चर्चा झाली. पेपरमध्ये फोटोही आले आहेत. त्यामुळे फक्त राष्ट्रवादीचा पराभव करा या हेतूने सर्व पक्ष एकत्र आले होते. तरीही आम्हाला चांगले यश मिळाले आहे. ईश्वचिठ्ठीमुळे दुर्दैवाने गेलो नाहीतर बहुमतापर्यंत आलो असतो. पण हा पराभव का झाला याचे चिंतन करण्याची गरज असून आम्ही ते करु, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले. 

दरम्यान, भाजपने २२, काँग्रेस २१ तर शिवसेनेने १७ नगर पंचायतींवर झेंडा फडकविला आहे. सर्वाधिक ३८४ जागा भाजपने जिंकल्या. त्या खालोखाल राष्ट्रवादीने ३४४, शिवसेनेने २८४ तर काँग्रेसने ३१६ जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला आहे. 

टॅग्स :Nagar Panchayat Election Result 2022नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२eknath khadseएकनाथ खडसेNCPराष्ट्रवादी काँग्रेस