शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

राष्ट्रवादीने उपराष्ट्रपती नायडूंच्या प्रतिमेला काळे फासले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 8:51 PM

राज्यसभेत शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणाबाजी केली असता त्यास उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी विरोध केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गुरुवारी शिवतीर्थ मैदानाजवळ घोषणाबाजी करुन नायडूंच्या प्रतिमेवर शाई फेकून काळे फासत त्यांचा निषेध नोंदविला तर शिवसेनेनेही घोषणाबाजी व निदर्शने करुन नायडूंचा निषेध नोंदविला. दरम्यान, याप्रकरणी राष्टÑवादीच्या ९ तर शिवसेनेच्या ७ अशा १६ जणांविरुध्द जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आंदोलनकर्त्यांना अटक करुन लागलीच सोडण्यात आले.

ठळक मुद्देशिवसेनेची निदर्शने१६ जणांविरुध्द गुन्हा  अटक व सुटका

जळगाव : राज्यसभेत शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणाबाजी केली असता त्यास उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी विरोध केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गुरुवारी शिवतीर्थ मैदानाजवळ घोषणाबाजी करुन नायडूंच्या प्रतिमेवर शाई फेकून काळे फासत त्यांचा निषेध नोंदविला तर शिवसेनेनेही घोषणाबाजी व निदर्शने करुन नायडूंचा निषेध नोंदविला. दरम्यान, याप्रकरणी राष्टÑवादीच्या ९ तर शिवसेनेच्या ७ अशा १६ जणांविरुध्द जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आंदोलनकर्त्यांना अटक करुन लागलीच सोडण्यात आले. राष्टÑवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक शांताराम पाटील, युवक अध्यक्ष स्वप्नील प्रकाश नेमाडे, अ‍ॅड.कुणाल बन्सीलाल पवार, डॉ.रिजवान इसा खाटीक, कौसर शेख हारुण काकर, किरण कडू वाघ, अनिल मोहन पवार, हर्षवर्धन दीपक खैरनार, अकील अहमद गुलाम दस्तगीर पटेल यांच्यासह इतर ५ ते ७ जणांविरुध्द तर शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद श्यामराव तायडे, मनपाचे विरोधी पक्षनेते सुनील सुपडू महाजन, विजय लक्ष्मण बांदल, पूनम रायसिंग राजपूत, जितेंद्र रामकृष्ण मुंदडा, रईस शेख रशीद शेख व जाकीर पठाण यांच्यासह ७ ते ८ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला असून जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे गोपनीयचे कर्मचारी उमेश दंगलराव पाटील यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

राज्यसभेत सदस्यत्त्वाची शपथ घेतल्यानंतर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’, अशी घोषणाबाजी केली. त्यामुळे संतप्त होऊन उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी विरोध केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला विरोध करणे, ही बाब मराठी माणसांच्या अस्मितेला ठेच पोहचवणारी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपराष्ट्रपती नायडू यांच्या वर्तवणुकीचा निषेध नोंदवण्यात आला आहे. शहरातील शिवतीर्थाजवळ एकत्र येत दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी नायडू यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन त्यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. लोकसभा निवडणुकीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन त्यांनी मते मिळवली. आता मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला विरोध करून भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण भारताची अस्मिता आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रकार कदापि खपवून घेणार नाही, असे यावेळी राष्टÑवादी अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक व महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी सांगितले.