भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळ्याबाबत महाविकास आघाडी सरकारच्या काळात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला हाेता. सरकार बदलताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्यासाठी शनिवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांच्या न्यायालयात अर्ज केला आहे. या प्रकरणी २६ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान, यावर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली असून एकनाथ खडसे भोसरी गैरव्यवहार प्रकरणात जेलमध्ये जातील, हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ असल्याचं ते म्हणाले.
"दोन वर्षांपासून ज्या केसेस सुरू आहे, ईडीची जी चौकशी सुरू आहे, बोसरी प्रकरणात जे प्रकरणात त्यांनी जे पराक्रम केले आहेत, ते सर्वांच्या समोर आहेत. त्यांचे जावई वर्षभरापासून तुरूंगात आहेत. त्यांना न्यायालय अजूनही जामीन का देत नाही. त्यात अनियमतता आहे," असं महाजन म्हणाले. माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.