जामनेर : पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस दरवाढीविरोधात सोमवारी येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसीलवर मोर्चा काढून केंद्र शासनाच्या धोरणांचा निषेध केला. हातगाडीवर दुचाकी व रिकामे सिलिंडर घेत मोर्चा काढण्यात आला.
तहसीलदार अरुण शेवाळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना संकटाने सर्वसामान्यांना जगणे कठीण होत असतानाच इंधन दरवाढीने महागाई वाढतच आहे. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गरुड, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील, शहराध्यक्ष पप्पू पाटील, माधव चव्हाण, डॉ. प्रशांत पाटील, विलास राजपूत, अनिस पठाण, विनोद माळी, राजू नाईक, विशाल पाटील, सागर कुमावत, प्रल्हाद बोरसे, प्रभू झाल्टे, गजानन पाटील, अहेफाज मुल्लाजी, डॉ. बाजीराव पाटील, सागर पाटील, नरेंद्र जंजाळ, संतोष झाल्टे, अमोल पाटील, विशाल रोकडे, दीपक रिछवाल, शाहीद ईकबाल, गजानन पाटील, किरण जंजाळ, आदी उपस्थित होते.
===Photopath===
240521\24jal_14_24052021_12.jpg
===Caption===
जामनेरला पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढविरोधातील मोर्चात सहभागी राष्ट्रवादीचे पदाधिकारी.