मुक्ताईनगर : गेल्या काही दिवसांत पेट्रोल, डिझेल, गॅस आणि खाद्यतेल व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी दरवाढ झाली आहे. या दरवाढीविरोधात मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.
पेट्रोल, डिझेल, खाद्यतेलासह गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये प्रचंड वृद्धी झाल्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महागाईची अंत्ययात्रा सोमवारी काढली. यात प्रतीकात्मक स्वरूपातील वाहन आणि सिलिंडरला मृतदेह मानून सर्व विधीवत संस्कार करून जोरदार घोषणाबाजी करीत जिल्हाध्यक्ष रवींद्रभैया पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चेवजा अंत्ययात्रा काढण्यात आली.
यावेळी माजी आमदार अरुण पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, किसान सेल जिल्हा अध्यक्ष सोपान पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, गोटू सेठ महाजन, सावदा माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, ज्येष्ठ नेते रमेश नागराज पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, तालुकाध्यक्ष यू. डी. पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, युवक कार्याध्यक्ष दीपक पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवनराजे पाटील, सोशियल मीडिया अध्यक्ष शिवराज पाटील, पं.स. सभापती सुवर्णा साळुंखे, उपसभापती सुनीता चौधरी, माजी सभापती दशरथ कांडेलकर, विलास धायडे, राजू माळी, भागवत पाटील, वसंत पाटील, किशोर चौधरी, माफदा तालुका अध्यक्ष रामभाऊ पाटील, सरचिटणीस रवींद्र दांडगे, कल्याण पाटील, सोपान दुट्टे, साहेबराव पाटील, युवक विधानसभा क्षेत्र प्रमुख गजानन पाटील, युवक तालुका अध्यक्ष शाहीद खान, महिला आघाडी तालुका अध्यक्ष लता सावकारे, सुनील कोंडे, विशाल महाराज खोले, रावेर बाजार समिती संचालक पंकज येवले, सय्यद असगर, सुधाकर जावळे, दीपक मराठे, लीलाधार पाटील यांची मोर्चात प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मोर्चात डॉ. बी. सी. महाजन, अतुल युवराज पाटील, चंद्रशेखर बढे, प्रदीप साळुंखे,
सुनील काटे, विकास पाटील, रमेश खंडेलवाल, रवींद्र पाटील, बापू ससाणे, ओमप्रकाश चौधरी, रणजित गोयनका, प्रवीण पाटील, आमीन खान, रऊफ खान, संदीप जावळे, सचिन महाले, गणेश तराळ, सुनील पाटील, नंदकिशोर हिरोळे, राजेश ढोले, प्रवीण दामोदरे, मुन्ना बोडे, सपना चौधरी, माजी सभापती रंजनाताई कांडेलकर, प्राजक्ता चौधरी, मीनल चौधरी, नीताताई पाटील, कावेरी वंजारी आदींचा सहभाग होता.
फोटो कॅप्शन
मुक्ताईनगर येथे इंधन दरवाढीच्या निषेधार्थ अंतयात्रा काढून निषेध करताना जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्ष ॲड. रोहिनी खडसे-खेवलकर, माजी आमदार अरुण पाटील व इतर.
(छायाचित्र विनायक वाडेकर, मुक्ताईनगर)