जळगाव : चार वर्षात सत्तेतील भाजपा सरकारने जनतेला केवळ ‘गाजर’ दाखविण्याचे काम केले. याचा निषेध म्हणून राष्टÑवादी कॉँग्रेस महानगरतर्फे बस स्थानकावर नागरिकांना गाजर देऊन आंदोलन करण्यात आले. यावेळी सत्तेतील भाजपा सरकार विरोधात विविध घोषणा देण्यात येत होत्या.भाजपा सरकारला चार वर्षे पुर्ण झाली. या चार वर्षांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला केवळ आश्वासने दिली. आश्वासने पूर्ण झाली नाहीत मात्र महागाई, नोटबंदी यामुळे विविध क्षेत्रातील उद्योग, नागरिक अडचणीत आले. या सर्व बाबींचा निषेध करण्यासाठी राष्टÑवादी महानगरतर्फे बुधवारी बस स्थानक परिसरात बस स्थानकावरील प्रवाशांना गाजर देऊन अनोखे आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष नामदेव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, जिल्हा समन्वयक विकास पवार, प्रवक्ते योगेश देसले, वाय.एच. महाजन, प्रदेश उपाध्यक्षा मंगला पाटील,महिला महानगर अध्यक्षा निला चौधरी, मिनल पाटील, सोपान पाटील, प्रतिभा शिरसाठ, मनिषा देशमुख, काशिनाथ इंगळे, सुदाम पाटील, प्रकाश पाटील, अॅड. सचिन चव्हाण, भरत कर्डिले, तुषार इंगळे, सागर पाटील उपस्थित होते.बस मधील प्रवाशांना दिले गाजरआंदोलनात सहभागी पदाधिकारी दुपारी २ वाजता बस स्थानक परिसरात आले होते. प्रारंभी सरकार विरोधात विविध घोषणा देण्यात आल्या. शेतकऱ्यांना दिलेली फसवी कर्जमाफी, नोटबंदीने झालेले नुकसान, पेट्रोल-डिझेलची महागाई, कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगाचे दाखविलेले गाजर, मराठा, धनगर समाज आरक्षणाची मागणी करत असताना त्याकडे होणारे दुर्लक्ष, महिला अत्याचाराच्या घटना अशा विविध मुद्यांकडे पदाधिकाºयांनी नागरिकांचे लक्ष वेधले. यानंतर बसस्थानकातील नागरिकांना पदाधिकाºयांनी गाजर देऊन शासनाच्या भूमिकेचा निषेध केला.
जळगावात भाजपा सरकारविरुद्ध ‘राष्ट्रवादी’चे गाजर वाटप आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 1:10 PM