आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २२ - जिल्ह्यातील ११ विधानसभा क्षेत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ६६ जिल्हा प्रतिनिधींची नावे जिल्हा निरीक्षकांकडे पाठविण्यात आली असून रविवारी जिल्हाध्यक्ष निवडीसंदर्भात बैठक होणार आहे. यामध्ये जिल्हा प्रतिनिधींनी सुचविलेल्या नावाव्यतिरिक्त उमेदवार पक्षश्रेष्ठींना सक्षम वाटत असेल तर, त्यांच्या नावावरही शिकामोर्तब करु शकतात, असे संकेत जिल्हा निरीक्षक रंगनाथ काळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले़राष्ट्रवादी काँग्रेसच्या महानगराध्यक्ष तसेच तालुका निवडी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शनिवारी बैठक झाली. यामध्ये नीलेश पाटील यांचे महानगराध्यक्षपदासाठी एकमेव नाव सुचविण्यात आले. या निवडीसंदर्भात तालुक्याच्या ठिकाणी निरीक्षक पाठविण्यात आले होते. प्रत्येक विभानसभा क्षेत्रातून तीन प्रदेश प्रतिनिधी व सहा जिल्हा प्रतिनिधीनींची नावे देण्यात आली. ही नावे प्रदेशाध्यक्षांकडे पाठविण्यात येणार असून त्यापैकी एक नाव जिल्हाध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात येणार आहे़ परंतु पक्षश्रेष्ठींकडून अचानक नवीन नावदेखील समोर येऊ शकते अशी शक्यता काळे यांनी व्यक्त केली आहे़जळगाव जिल्ह्यातील तालुकाध्यक्षपदासाठी शनिवारी सायंकाळपर्यंत सात तालुक्यामधुन प्रत्येकी एकच नाव आल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात आहे़ यामध्ये भासवळ, मुक्ताईनगर, बोदवड, धरणगाव, एरंडोल, पारोळा, चाळीसगाव या तालुक्यांचा समावेश आहे.प्रदेश प्रतिनिधींकरीता जिल्ह्यातून प्रत्येक क्षेत्रातून तीन अर्ज मागविण्यात आले असून असे एकूण ३३ अर्ज प्राप्त झाले आहेत़२९ रोजी पुण्यात प्रदेशाध्यक्षांची निवड होणार असून त्याच वेळी वरील सात तालुक्याध्यक्षांचीही नावे जाहीर होती, असेही काळे यांनी सांगितले़यावेळी माजी़ जि प़ अध्यक्ष रवींद्र पाटील, माजी आ़मदार अरुण पाटील, विकास पवार, महिला अध्यक्षा कल्पना पाटील, महिला कार्याध्यक्षा मीनल पाटील, युवती अध्यक्षा कल्पिता पाटील, माजी महिला शहराध्यक्षा प्रतिभा शिरसाठ, ओबीसी सेलचे अध्यक्ष उन्मेश नेमाडे, विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष रोहण सोनवणे, जि.प़ सदस्य रवींद्र पाटील, माजी सभापती राजेंद्र चौधरी, मुकेश येवले, राजेंद्र पाटील, अरविंद मानकरे, गणेश निंबाळकर आदी उपस्थित होते़.जामनेरात प्रयत्न पूर्ण प्रयत्न केलेजामनेर नगरपालिका निवडणुकीत पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही, यावर रंगनाथ काळे यांना विचारले असता, ते म्हणाले जामनेरमध्ये पूर्ण प्रयत्न केले. त्यात यश येऊ शकले नाही. इतरही निवडणुकांमध्ये फितुरांमुळे अपयश येत असल्याच्या चर्चेबद्दल विचारले असता फितुरांवर कारवाई झाली पाहिजे व कोणत्याही निवडणुकीच्या वेळी वरिष्ठ नेत्यांनी तेथे गेले पाहिजे, असे मत काळे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादीच्या जळगाव जिल्हाध्यपदावर पक्षश्रेष्ठी करणार शिकामोर्तब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:56 PM
निरीक्षक रंगनाथ काळे यांची माहिती
ठळक मुद्देसात तालुक्यातून तालुकाध्यक्षपदासाठी प्रत्येकी एकच नावजामनेरात प्रयत्न पूर्ण प्रयत्न केले