पाचोरा : विनोद करायला किंवा समजायला पैसे लागत नाहीत. चेहरा प्रफुल्लित ठेवण्यासाठी विनोद महत्त्वाचा असतो, असे प्रतिपादन येथील व्याख्यानातील एकपात्री प्रयोगातून सुरेंद्र गुजराथी यांनी व्यक्त केले. येथील नगर पालिका संचालित महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालायतर्फे आयोजित ५७ व्या शारदीय व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना ‘वाह क्या बात है’ हा अफलातून, धमाल असा मराठमोळा एकपात्री प्रयोग त्यांनी सादर केला. विषयावर सुरेंद्र गुजराथी यांनी एकपात्री प्रयोग सादर केला.आपल्या विनोदी शैलीत एकपात्री प्रयोग सादर करताना गुजराथी यांनी त्यांच्या जीवनातील विविधांगी प्रसंग काव्यमैफिलीतून सादर केले. यावेळी शाब्दिक विनोदाने पाचोरेकर लोटपोट झाले. प्रेमाला वय नसते, योग्य वयात योग्य कर्तव्या पार पाडायलाच हवे, असेही गुजराथी त्यांनी श्रोत्यांना काव्यातून पटवून दिले. यावेळी श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.एकपात्री प्रयोगातून छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत ‘इथे ओशाळला मृत्यू’ यावर प्रकाशझोत टाकून त्यांनी श्रोत्याची मने जिंकली. सूत्रसंचालन ललित सोनार यांनी केले. नगराध्यक्ष संजय गोहिल, शरद पाटे, दता जडे, प्रकाश भोसले, श्याम ढवळे, गजानन पाटील यांच्यासह असंख्य श्रोते उपस्थित होते.
चेहरा प्रफुल्लित ठेवण्यासाठी विनोदाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 10:12 PM