जामनेर : शासकीय तूर खरेदी केंद्रावर मोजणीस लागणारा विलंब लक्षात घेऊन गुरुवारी शेतकरी संघाने एक काटा वाढविला असला तरी तुरीची वाढती आवक पाहता व मोजणीसाठी थांबलेले शेतकरी यांची संख्या लक्षात घेतली तर संघाने आणखी पाच काटे वाढविण्याची मागणी होत आहे.दरम्यान, शेतक:यांच्या तुरीने भरलेल्या ट्रॅक्टरला क्रमांकाचे टोकन दिले असल्याने त्या क्रमानेच मोजणी घेणे अपेक्षित आहे. मात्र या मोजणीतदेखील कर्मचा:यांकडून वशिलेबाजी होत असल्याचा आरोप काही शेतक:यांनी केला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. याचबरोबर व्यापा:यांशी लागेबांधे असल्याने काही व्यापा:यांच्या तुरीची खरेदीदेखील शेतक:यांना डावलून होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.गुरुवारी खरेदी केंद्रावर मोजणीच्या ठिकाणी व्यापा:यांची उपस्थिती दिसत असल्याने या संशयाला बळकटी येत असल्याचा आरोप शेतक:यांनी केला आहे. बुधवारी सायंकाळर्पयत 401.82 क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आल्याची माहिती शेतकरी संघाच्या सूत्रांनी दिली.सध्या बाजार समिती आवारात सुमारे पाच हजार क्विंटल तूर मोजणीअभावी पडून आहे. बुधवारी रात्री ढगाळ वातावरण झाल्याने कोणत्याही क्षणी पाऊस पडण्याची शक्यता पाहून उघडय़ावरील तूर बाजार समितीने शेडमध्ये ठेवू द्यावी, अशी विनंती शेतक:यांनी केली. मात्र शेड लग्नासाठी दिले जात असल्याने तूर ठेवता येणार नाही, असे कर्मचा:यांनी सांगितल्याचे शेतक:यांचे म्हणणे आहे.काटे वाढविण्यास शेतकरी संघ असमर्थतुरीची वाढती आवक पाहता काटे वाढविले पाहिजेत, अशी शेतक:यांची मागणी असली तरी वाढीव काटय़ांसाठी वाढीव कर्मचारी पुरविण्यास आम्ही असमर्थ असल्याचे शेतकरी संघाच्या सूत्रांनी सांगितले.शासनाने शेतक:यांच्या हितासाठी हमी भावाने तूर खरेदी केंद्र सुरू केले असून एका शेतक:याच्या सातबारा उता:यावर एकरी चार क्विंटल खरेदी केली जाते. काही शेतकरी व्यापा:यांना उतारे देत असल्याने व्यापारी त्यांनी खरेदी केलेली तूर आणून विकतात. त्यामुळे शेतक:यांनी आपले उतारे व्यापा:यांना देऊ नये.-चंद्रकांत बाविस्कर,चेअरमन, शेतकरी संघ, जामनेर
तूर खरेदीसाठी काटे वाढविण्याची आवश्यकता
By admin | Published: March 09, 2017 11:57 PM