जळगाव- स्थानिक पातळीवर सॉफ्टवेअर उद्योग विकास काळाची गरज असल्याचा उद्योजकांचा सूर शनिवारी सॉफ्टवेअर डेव्हलोपमेंट विषयावर आयोजित कार्यशाळेमध्ये उमटला.एसएसबीटी महाविद्यालयात सॉफ्टवेअर डेव्हलोपमेंट या विषयावर चर्चासत्र पार पडले़ कार्यक्रमात शहरातील उद्योजकांची उपस्थिती होती़ दीपप्रज्वालनाने कार्यक्रमाला सुरूवात झाली़ याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.एस.वाणी, उपप्राचार्य डॉ. एस.पी.शेखावत, किशोर खडसे, डॉ.जी.के. पटनाईक, डॉ.यु.एस.भदादे, गणेश नाईक, डॉ.एस.ए.ठाकूर, डॉ.के.पी.अढिया, डॉ.एस.आर.सुरळकर, प्रसाद नेवे, डॉ.एस.आर.दिवरे, डॉ.पी.जे.शाह आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ़ यु़एस़भदादे यांनी केले़ चार सत्रांमध्ये झालेल्या चर्चासत्रामध्ये भारतातील सॉफ्टवेअर उद्योगाची वाढ, विकास आणि भविष्यातील व्याप्ती या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले़ त्याचबरोबर सॉफ्टवेअर उद्योगात नोकरी आणि करिअरच्या संधींचे स्वरूप या विषयावर उद्योजकांनी मार्गदर्शन केले़ सूत्रसंचालन प्रा़ दीनेश पुरी यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन डॉ़एस़ए़ठाकुर यांनी मानले़ यशस्वीतेसाठी प्रा. रोहिदास सांगोरे, प्रा. सुशांत बाहेकर, प्रा. दीपक बगे व प्रा. प्रवीण़ के. पाटील यांनी परिश्रम घेतले.