ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि 11-शिक्षण घेऊन आपण फक्त आपले पात्रतेचे निकष पूर्ण करीत असतो. मात्र त्यातून यशाची सिद्धता आपणास प्राप्त होत नाही. त्यासाठी शिक्षण तर महत्वाचे आहेच त्यासोबत तुमचा कौशल्य विकास गरजेचा असल्याचे मत डॉ. दीपक शिकारपूर यांनी व्यक्त केले.
जी.एच.रायसोनी बिझनेस मॅनेजमेंटमध्ये रोटरी क्लब गोल्ड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक स्तरावर रोजगाराच्या संधी या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी संचालिका डॉ.प्रीती अग्रवाल, रोटरीचे अध्यक्ष अभिषेक अग्रवाल, सेक्रेटरी संजय दहाड, सी.ए.प्रवेश मुंदडा, प्रखर मेहेता, सी.ए.प्रिती मंडोरे, अनुराधा अग्रवाल, ममता दहाड उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.शिकारपूर म्हणाले, जगभरात खूप सा:या संधी आहेत. उपलब्ध संधी मिळविण्यासाठी तुम्ही काय प्रय} करतात. याच्यावर तुमचे भविष्य अवलंबून आहे. तुमच्याकडे कल्पक बुद्धी असेल तर संधी शोधण्याची नजर आपण विकसित करू शकता. शिक्षण घेऊन तुम्हाला दिशा मिळेल. यशाची गती स्वत:ला प्राप्त करायची आहे. आपण जर आईसक्रिम खात असाल तर फारच उत्तम पण मराठीत अर्थ बोध झालेली आईसक्रिम म्हणजे आत्मविश्वास, इच्छाशक्ती, सक्रियता, क्रियाशीलता, व महत्वकांक्षा ही जर आईसक्रिम तुम्ही खात असाल तर यश तुमच्या पायथ्याशी आहे, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
महाविद्यालयातील विद्याथ्र्यानी शिक्षणासोबत कौशल्यावर आधारित शिक्षण देणे गरजेचे आहे. ज्याठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत त्याठिकाणी आवश्यक कौशल्य विकसित झालेली व्यक्तीची मागणी असते. सर्वात महत्त्वाचे तुमचे इंग्रजी संवाद कौशल्य, तुमचा आत्मविश्वास, सादरीकरण, मेहनत घेण्याची तयारी आणि तुमचे ज्ञान असा सर्वागिण विकास होणे काळाची गरज असल्याचे मत संचालिका डॉ.प्रीती अगरवाल यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा.राहुल त्रिवेदी तर आभार प्रा.विजय गर्गे यांनी मानले.