शिरपूर, दि.10 - रासायनिक खतांची हेराफेरी आणि शेतक:यांना वेठीस धरणा:यांना चांगलाच चाप बसणार असून, आधार क्रमांकाशिवाय रासायनिक खते खरेदी करणे शक्य नाही़ तसेच 1 जून 2017 पासून कृषी सेवा केंद्रांना देखील खत विक्री करता येणार नाही़
रासायनिक खतनिर्मिती करणा:या कारखान्यांना भरमसाठ सबसिडी सरकार डायरेक्ट पाठवित होता़ आता ती शेतक:यांना खत सेवा केंद्रातून खरेदी केल्यावरच शक्य होणार आह़े
शासनाचा कृषी क्षेत्रासाठी पारदर्शक कार्यक्रम कार्यान्वीत होत आह़े शिरपूर तालुक्यात 75 ई-पीओएस (ई-पाँईट ऑफ सेल्स) मशीनचे वितरण केले जाणार आह़े आधार कार्डावरील नंबर खरेदी केलेले बिलदेखील त्याचवेळी शेतक:यांना जागेवर मिळणार आह़े खत टंचाई व साठेबाजीवर दरवर्षी होणारा गोंधळ आणि शेतक:यांची गैरसोय, यामुळे मात्र टळणार आह़े
पीओएस मशिन कसे हाताळावे या संदर्भात कृषी सेवा केंद्रातील संचालकांना प्रशिक्षण नुकतेच देण्यात आले आह़े त्या मशीनवर शेतक:यांचे आधार कार्ड नंबर आणि बोटाचे ठसे मॅच झाल्यावरच शेतक:यांना खत घेता येणार आह़े ज्यांनी आधार कार्ड काढले नसतील त्या शेतक:यांना आधार कार्ड काढावे लागणार आह़े ज्यांचे कार्ड अद्ययावत झाले नसतील ते करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा परिषद कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.